पिंपरी- चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे. या तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – जुन्या वाहनांना आता नवीन नंबर प्लेट बंधनकारक! लवकरच अंमलबजावणी सुरु होणार

हेही वाचा – पुणे : माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरला

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरातील असून तरुणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. अत्यंत बिनधास्तपणे हा तरुण गाडीच्या टपावर बसलेला दिसतो. त्याला कुठलीच भीती नाही, असे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडीओच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली. अशा पद्धतीने कोणीही स्टंटबाजी करू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth stunt by sitting on the top of a running vehicle in pimpri the police are looking for youth kjp 91 ssb