लोहगाव भागातील एका सोसायटीत आठव्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

अर्णव तुहीनेहदूर मुखोपाध्याय (वय ३८, रा. जेनीबेलिया सोसायटी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमाननगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. अर्णव एका दूरसंचार कंपनीत नोकरीला होता. मंगळवारी रात्री त्याने मद्यप्राशन केले होते. तो आठव्या मजल्यावर राहायला आहे. सदनिकेच्या गॅलरीतून त्याने उडी मारुन आत्महत्या केली. सोसायटीतील रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अर्णवचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.

अर्णवच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Story img Loader