मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस होत आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात सायंकाळच्या सुमारास कात्रज लेकटाऊन येथून २६ वर्षीय अक्षय साळुंखे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. या युवकाचा अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून शोध सुरू होता. आज सकाळी अक्षय साळुंखे या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा – पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेने स्वयंपाकघरातील चाकूने भोसकून घेतले, महिलेचा मृत्यू; पती अटकेत

Father murder by psychopath, Risod Taluka,
अकोला : मनोरुग्णाकडून वडिलांची हत्या, घरातच केले डोक्यावर वार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
student physically assaulted, government hostel ,
बुलढाणा : शासकीय वसतिगृहेदेखील असुरक्षित! अधीक्षकाचा विद्यार्थ्यावर अत्याचार
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
child hit by a garbage truck Ulhasnagar, Ulhasnagar,
कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेत लहानग्याने गमावला पाय, उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण
two-wheeler road accident Sukali village nagpur
नागपूर : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन ठार
Pandurang Ulape Kolhapur
“..आणि मृत घोषित करण्यात आलेले आजोबा जिवंत झाले”, कोल्हापुरात घडली अविश्वसनीय घटना

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची चाळण, शहरात किती खड्डे?महापालिकेचा काय आहे दावा?

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज लेकटाऊन येथून २६ वर्षीय अक्षय साळुंखे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. त्याबाबतची माहिती मिळाल्यावर, गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून वाहन पाठवत शोध घेण्यात आला होता. पंरतु धरण क्षेत्रातून वाढता विसर्ग आणि पाण्याचा प्रवाह पाहता अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यादिवशी शोध घेऊनही युवक सापडला नाही. दुसऱ्या दिवशी घटनेचे गांभीर्य ओळखून गंगाधाम आणि कात्रज अग्निशमन वाहन लेकटाऊन, जनता अग्निशमन वाहन शंकर महाराज मठाजवळ, स्वामी विवेकानंद पुतळा आणि आज कसबा येथील वाहनाने मनपाजवळील नदीपात्र येथे रश्शी, गळ, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याचा वापर करत युद्धपातळीवर शोधकार्य सुरु होते. आज सकाळी दहा वाजता मनपा भवनालगत असलेल्या डेंगळे पुलाखाली एक मृतदेह पाण्यात आढळून आला, तो अक्षय साळुंखेचा असल्याचे स्पष्ट झाले.

Story img Loader