पुणे : येरवडा भागात सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. तरुणांच्या डोक्यात स्टम्प मारण्यात आला. शेखर उत्तम कांबळे (वय ३४, धानोरी रस्ता, विश्रांतवाडी) आणि प्रशांत जाधव अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत कांबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येरवडा भागातील काॅमर झोन कंपनीच्या परिसरातील मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कांबळे आणि जाधव क्रिकेट सामना पाहण्यासाठी आले होते. त्या वेळी तिघे जण तेथे आले. तुम्ही कुठे राहतात, अशी विचारणा केली. तेव्हा कांबळे यांनी विश्रांतवाडी भागात राहायला असल्याचे सांगितले. तुम्ही विरोधी संघातील असल्याचे सांगून तिघांनी कांबळे आणि त्यांचा मित्र जाधव यांना स्टम्पने मारहाण केली. फावड्याचे दांडके डोक्यात मारल्याने दोघे जखमी झाले. त्यानंतर तिघे जण पसार झाले. पोलीस हवालदार खराडे तपास करत आहेत.