पिंपरी : बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आपले बंधू युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचे शरद पवार यांनी ठरविले आहे. परंतु, या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही. निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास पार्थ पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांकडे कोणी केली मागणी?

युगेंद्र पवार तो मोठा आहे. त्याचा वैयक्तिक निर्णय राहील असे सांगत पार्थ पवार यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून चिंचवडही राष्ट्रवादीला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे पार्थ यांनी भाजपचा आमदार असलेल्या मतदारसंघावर अप्रत्यक्षपणे दावा केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरात राज्यपाल नियुक्त आमदार मिळाला पाहिजे. भाजपने दोन आमदार दिले, पुण्यातही एक आमदार दिला. पिंपरी चिंचवड  शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शहरात विधानपरिषद आमदारकी द्यावे अशी मी शिफारस अजित पवार यांच्याकडे केली आहे. मी संघटनेतील कोणतेही पद घेणार नाही, निवडणूक लढविण्यापेक्षग पक्ष वाढविणावर माझा भर आहे, असेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yugendra pawar contest assembly polls from baramati constituency against ajit pawar pune print news ggy 03 zws