पुणे : भरधाव टेम्पोने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात घडली. अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा कांदळी गावातील महाविद्यालयीन तरुण युवराज महादेव वाव्हळ (वय २३) याचा मृत्यू झाला. युवराजचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. अपघातात कांदळी गावातील शिक्षिका मनीषा नानासाहेब पाचारणे (वय ५६) यांचा मृत्यू झाला.

अपघातात विनोद केरभाऊ रोकडे (वय ५०), युवराज महादेव वाव्हळ (वय २३), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७), गीता बाबूराव गवारे (वय ४५), भाऊ रभाजी बढे (वय ६५), मनीषा नानासाहेब पाचारणे (वय ५६) यांच्यासह नऊ जणंचा मृत्यू झाला. कांदळी गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांना धक्का बसला. पंचक्रोशीत शोककळा पसरली. अपघातात देवूबाई दामू टाकळकर (वय ६५, रा. वैशाखखेडे, ता. जुन्नर), नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५, रा. गड्डी मैदान, राजगुरुनगर, ता. खेड), वसीफा वासीम इनामदार (वय ५) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कांदळी, वैशाखखेडे गावातील रहिवासी कामानिमित्त बाहेर पडले होते.

हेही वाचा >>>महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून अतिरिक्त निधी; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

आळे फाटा परिसरातून ते प्रवासी वाहतूक करणऱ्या व्हॅनमधून निघाले होते. युवराज वाव्हळ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याला अधिकारी व्हायचे होते. नेहमीप्रमाणे तो सकाळी घरातून बाहेर पडला. नारायणगावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संस्थेत तो व्हॅनमधून निघाला होता. मनीषा पाचारणे नारायणगाव परिसरातील आनंदवाडीतील भागातील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या. पाचारणे निवृत्तीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यांचे पती निवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्यामागे पती, दोन मुले असा परिवार आहे. शाळेत जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाचारणे यांचा अपघाताी मृत्यू झाल्याची समजताच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थांना धक्का बसला.

राजगुरुनगर भागातील रहिवासी नजमा शेख या पाच वर्षांच्या वसीफा हिच्यासह नारायणगाव परिसरातील नातेवाईकांंकडे आल्या होत्या. तेथून परतत असताना अपघात झाला. अपघातात नजमा यांच्यासह वसीफाचा मृत्यू झाला.

Story img Loader