कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ, कारवारी भेळ, दडपे पोहे, शेवभाजी, खास मराठी चवीच्या भाज्या.. अशा वैविध्यपूर्ण पदार्थानी नटलेल्या ‘झकास मिसळ एक्सप्रेस’ला भेट देणं हा खवय्यांसाठी नेहमीच आनंददायी अनुभव असतो..

एखाद्या हॉटेलमध्ये मिसळ खायला जायचं असं ठरवून आपण गेलो, तर स्वाभाविकच तिथे गेल्यानंतर आपण जितके जण असतो तेवढय़ा मिसळ अशी ऑर्डर देतो. सातारा रस्त्यालगत सहकारनगरमध्ये ट्रेजर पार्कमध्ये असलेल्या ‘झकास मिसळ एक्सप्रेस’मध्ये गेल्यानंतरही आम्ही तशीच ऑर्डर दिली. त्यावर ऑर्डर घेणाऱ्याचा प्रश्न होता की कोणती मिसळ, नाशिक का कोल्हापूर? हा प्रश्न ऐकून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. दोन प्रकारच्या मिसळी आणि एकाच ठिकाणी? म्हणून मग दोन्ही मिसळी मागवल्या. मिसळीचा सगळा खेळ रश्श्यावर किंवा सँपलवर अवलंबून असतो. मिसळ एक्सप्रेसमध्ये मिळणारी नाशिक मिसळ ही पूर्णत: काळ्या मसाल्यात तयार होणाऱ्या रश्श्याची आणि कोल्हापुरी मिसळ ही लाल भडक रश्श्याची. शिवाय ती देतानाही देणाऱ्याचा हात एकदम सढळ असतो. दोन्ही मिसळी मोठय़ा थाळ्यांमध्ये दिल्या जातात. शिवाय पावाची जोडी, कांदा, घट्ट दह्य़ाची वाटी आणि पापड असेही पदार्थ त्या थाळीत असतात. ते पाहूनच समाधान होतं. मिसळ देताना आधी आपल्याला विचारलं जातं, की लाईट, मीडियम का तिखट?  त्यानुसार अगदी कमी तिखटाची, मध्यम तिखटाची किंवा तिखट मिसळ दिली जाते. शिवाय सँपलचा कडीचा मग आणि डावही आपल्याशेजारीच ठेवलेला असतो. त्यामुळे सँपलप्रेमींसाठी ती पर्वणीच असते.

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे

हृषीकेश इनामदार या हरहुन्नरी तरुणाचं हे हॉटेल आहे. तो मूळचा अकलूजचा. खाद्यप्रांताची मनापासून आवड असल्यामुळे द्विपदवीधर झाल्यानंतरही तो नोकरीच्या मागे लागला नाही आणि थेट या व्यवसायात उतरला. या क्षेत्राची त्याला आवड होती; पण अनुभव असा काही नव्हता. तरीही त्याने हे वेगळं क्षेत्र निवडलं आणि त्यात त्याचा छान जम बसलाय. गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये सकाळी जाऊन कराव्या लागणाऱ्या रोजच्या भाजीखरेदी पासून त्याचा दिवस सुरू होतो तो रात्री उशिरा संपतो.

मिसळ एक्सप्रेसमध्ये तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ आपल्यासाठी तयार असतात. या हॉटेलचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ं हे, की इथे कुठलाही पदार्थ तयार करून ठेवलेला नसतो. म्हणजे भाज्या चिरून ठेवलेल्या असतात, मसाले तयार असतात. तुम्ही ऑर्डर दिली की हवी ती भाजी किंवा हवा तो पदार्थ तयार करून दिला जातो. अगदी मटकीची उसळ, मटकी फ्राय, मटार उसळ, शेव भाजी या भाज्या किंवा पंजाबी भाज्याही ऑर्डर दिली की तयार होतात. त्यामुळे पदार्थ तुमच्या समोर तयार होताना तुम्हाला पाहता येतो आणि त्याचा घमघमाट आपण अनुभवत असतानाच तयार झालेला पदार्थ आपल्या टेबलवर येतो. हे सर्व सुरू असतानाची वेटर मंडळींची धावपळ, भटारखान्यातले आचारी आणि मावशी यांची विविध पदार्थ तयार करतानाची घाईगर्दी ही सगळी इथली दृश्यंही अनुभवण्यासारखीच. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे कोणताही विकतचा मसाला वापरला जात नाही. सगळे मसाले घरीच तयार केले जातात. त्यामुळे पदार्थाना विशिष्ट चव येते.

कारवारी भेळ, दडपे पोहे, भाजणीचं थालीपीठ, खेकडा भजी, गोल भजी, कांदा भजी, झकास व्हेज पुलाव, आलू पराठा हे इथले काही खास पदार्थ. त्याची प्रत्यकेची लज्जत काही वेगळीच. आलं वापरून केलेले दडपे पोहे असोत, चुरमुरे न वापरता फक्त फरसाण, खास चटणी आणि भेळेचं पाणी वापरून तयार केलेली कारवारी भेळ असो किंवा तव्यावरचं गरमगरम थालीपीठ असो.. या पदार्थाचा आस्वाद घेताना वेगळ्या चवीचा आनंद नक्कीच मिळतो. सर्वाची गरज लक्षात घेऊन इथल्या पदार्थाचं पॅकेज आहे. म्हणजे ज्यांना दुपारी फक्त पोळी भाजी खाऊन पटकन आपल्या कामाला जायचयं त्यांना पंजाबी भाजी आणि दोन पोळ्या साठ रुपयात घेता येतात आणि मराठी भाजी (मटकी उसळ किंवा बटाटा रस्सा) आणि दोन पोळ्या पन्नास रुपयात मिळतात. ज्यांना राईस प्लेट हवी असेल त्यांचीही इथे चांगली व्यवस्था होते. एक रस्सा भाजी, एक सुकी भाजी, तीन पोळ्या आणि दाल राईस अशा पदार्थाची राईस प्लेट पोटभर जेवणाचा आनंद देते आणि पन्नास रुपये हा दरही वाजवी असल्यामुळे इथली राईस प्लेटही प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हे सगळे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ इथे रोज मिळतात. फक्त सकाळी साडेदहा ते दुपारी चार आणि सायंकाळी सात ते रात्री साडेदहा ही वेळ सांभाळून जायला हवं.

 

कुठे मिळेल?

झकास मिसळ एक्सप्रेस

ट्रेजर पार्क, सातारा रस्त्यावरील,  नातूबाग ते सहकारनगर रस्ता

Story img Loader