अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. तीन मजली राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. त्याच्या तळमजल्यावर १६० खांब असतील, तर राम मंदिरात एकूण ३९२ खांब असतील. याशिवाय राम मंदिरात एकूण ४४ भव्य आणि मोठे दरवाजे असणार आहेत. मंदिराच्या तळमजल्यावर गाभारा असेल. यामध्ये भगवान श्रीरामाचे बालस्वरूप पाहायला मिळणार आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामांचा दरबार असेल. मंदिराचा दुसरा मजला विशेष कार्यक्रमांच्या आयोजनासाठी असेल. राम मंदिराव्यतिरिक्त त्याच्या भोवती चार दिशांना आणखी चार भव्य मंदिरे असतील.