Top 10 Kitchen Hacks : अनेकदा किचनमध्ये अशा गोष्टी घडतात की नेमकं वेळेवर काय करावं कळत नाही. अशावेळी काही ट्रिक्स किंवा टिप्स कामी येतात. आज आपण अशा काही खास ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला स्वयंपाक करताना किंवा स्वयंपाक घरात वावरताना कामी पडू शकतात.
MadhurasRecipe या युट्युब अकाउंटवरून मधुरा यांनी काही सोप्या आणि उपयुक्त अशा किचन टिप्स सांगितल्या आहेत. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मधुरा व्हिडीओच्या सुरुवातीला सांगतात, “आज आपण उपयुक्त अशा किचन टिप्स जाणून घेणार आहोत. अनेकदा किचनमध्ये धांदल असते, बऱ्याचदा गडबड होते अशावेळी आदळ आपट होते, त्या टाळण्यासाठी काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पडतील.”

मधुरा यांनी सांगितलेल्या खालील दहा टिप्स जाणून घेऊ या.

एकात एक अडकलेले भांडे कसे काढावे?

ग्लास, वाट्या, पातेलं आपण एकावर एक स्टॅक करतो आणि ते मग असं एकात एक अडकून पडतं आणि घट्ट होतं मग ते पटकन कसं बाहेर काढायचं. बऱ्याचदा लोक गरम पाण्यामध्ये ते सोडतात पण तेवढ्यासाठी गरम पाणी करण्याची गरज नाही. मग काय करायचं. पातेल्यात पाते अडकले असेल किंवा कोणतीही भांडे एकमेकांमध्ये अडकले असेल तर प्रथम एका वाटीत तेल घ्या. एका ब्रशने दोन्ही भांड्याच्या मधोमध तेल टाका ज्यामुळे घर्षण होईलहळू हळू काढायचा प्रयत्न करायचा. यामुळे अडकलेले भांडे सहज वेगळे करता येईल.

हिवाळ्यात इडलीचं बॅटर नीट आंबत नाही, काय करावे?

हिवाळ्यात इडलीचं बॅटर नीट आंबत नाही. अशावेळी मेथीचे दाणे टाकायचे. इडली, डोसा कोणतेही बॅटर तु्म्ही बनवत असाल तर मेथी दाणे घालायच्या. मेथी उष्ण असतात त्याच्या उष्णतेमुळे बॅटर लवकर आंबायला मदत होते. कुठलेही बॅटर इडलीचे असो किंवा डोसाचे असो पाच ते सहा तास पाण्यात भिजवलेले पुरेसे असतात आणि जास्त वेळ आंबायला ठेवा १५ ते १६ तास पिठ आंबायला वेळ मिळतो.

भाजीला लाल रंग येण्यासाठी नेमकं काय करावं?

टोमॅटो प्युरी बनवताना किंवा कोणतीही भाजी ज्याला रंग खूप छान हवा असेल उदा. पावभाजी आहे किंवा पंजाबी डिशसाठी ग्रेव्ही बनवायची आहे तर काय करायचं त्यात बीटाच्या फोडी करून टाकायच्या. बीट लवकर शिजतो ज्यामुळे त्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग येतो.

फ्रिजमधील दुर्गंध कसा दूर करावा?

फ्रिजमध्ये अनेकदा वेगळा असा विचित्र वास येतो. बऱ्याचदा फ्रिजमध्ये अन्नपदार्थ उघडे राहतात किंवा खराब होतात किंवा सर्व पदार्थांचा वास एकत्र मिळून विचित्र वास येतो. तो वास पटकन घालवायचा असेल तर वर्तमानपत्र घ्यायचं त्यावर थोडं पाणी शिंपडायचं. या वर्तमानपत्राचा गोळा करायचा आणि हा गोळा फ्रिजमध्ये ठेवायचा. सर्व दुर्गंध या वर्तमानपत्राच्या पेपरमध्ये शोषून घेतला जातो.

पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून काय करावे?

कणीक घट्ट मळायची. जितकी सैल कणीक होईल तितकं तेल जास्त शोषून घेतल्या जाईल. पुरी तळताना एकदा तेलात सोडली की त्यानंतर खालची बाजू छान तळल्यानंतर दुसरी बाजूला टर्न करायची आणि ती बाजू तळून झाली की लगेच बाहेर काढायची. सतत बाजू उलट पलट केल्या तर पुरी तेल खूप शोषून घेते. कारण ते एकदा फुलली की त्यात छोटे छोटे छिद्र येतात आणि सारखी उलट पलट केली की त्या छिद्रामध्ये आणखी तेल जात राहतं.

पाहा व्हिडीओ

भाजीला परफेक्ट ग्रेव्ही कशी करायची?

अनेकदा ज्या भाज्यांमध्ये आपण वाटण घालत नाही त्या भाज्यांना ग्रेव्ही येत नाही. विशेषत: जेव्हा कांदा टोमॅटो परतून घेतो, तेव्हा भाज्यांमध्ये ग्रेव्ही येण्यासाठी एक तर बेसन भाजून तुम्ही डब्यामध्ये साठवून ठेवू शकता आणि ते बेसन चमचाभर घालू शकता. बेसन भाजायचा कंटाळा येत असेल तर पंढरपुरी डाळ जी असते, चिवड्यामध्ये आपण घालतो, ते मिक्सरमध्ये बारीक करायची आणि ती पूड डब्यामध्ये ठेवायची आणि अशा भाज्यांमध्ये कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर टाकायची, यामुळे भाज्यांना छान दाटसरपणा येतो.

तर्रीची भाजी तयार करताना तेलाचा तवंग कसा आणायचा?

कुठलीही तर्रीची भाजी तयार करताना किंवा करीची भाजी तयार करताना, त्या भाजीला तेलाचा तवंग हवा असतो. हा तेलाचा तवंग येत नाही, अशी बऱ्याचदा तक्रार असते. अशा वेळी काय करायचं? मसाल्याचे तापमान गरम असते मसाला परतून झाला की त्याला तेलही सुटलेले असते आणि तेल आणखी सुटून त्याला तर्री आणण्यासाठी गरम गरम उकळलेलं पाणी त्या मसाल्यामध्ये घालायचं त्याचा तेलाचा तवंग जो आहे तो पटकन तयार होतो आणि भाजीला रंग आणि तवंग सुरेख येतो.

कुकरमधून पाणी उतू जाऊ नये, म्हणून काय करावे?

कुकरमधून अनेकदा तांदूळ किंवा डाळ शिजवताना पाणी उतू जातं. कुकर जितका क्षमतेचा आणि त्याच्या थोड्या कमी पाणी भरायचं.अशावेळी गॅसची आच कमी करावी. तुम्ही त्यात चमचाभर तेल टाकले तर पाणी उतू येत नाही

घरच्या घरी बटर पेपर कसा तयार करावा?

केक बनवताना बटर पेपर बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. अशावेळी तुम्ही घरच्या घरी बटर पेपर बनवू शकता. एखादा प्लेन पेपर घ्या, झेरॉक्स पेपर घ्यावा. त्यावर दोन्ही बाजूला तेल लावायचं. हा पेपर ज्या भांड्यामध्ये केक बनवताय, त्या भांड्यामध्ये पेपर ठेवायचा आणि त्यावर केकचे मिश्रण टाकायचे.असा तुम्ही घरच्या घरी बटर पेपर तयार करू शकता.

योग्यप्रकारे वडे कसे तळावे?

साबुदाणा वडा किंवा मेदू वडा तळताना अनेकदा सामान्य तक्रार असते की ते फुटतात आणि बऱ्याचदा इजा होते. हे तळण्यासाठी काय करावे? साबुदाणा वडा किंवा मेदू वडा मध्यम ते जास्त (खूप जास्त नाही) आचेवर तळावे. खूप कमी आचेवर तळू नये आणि खूप जास्त आचेवर सुद्धा तळू नये.