Monsoon Tea Time Snacks: पावसाळा आला की काहीतरी चटपटीत आणि गरमा-गरम खावस वाटतं. हातात चहा, भजी आणि पाऊस अस समीकरण सर्वांनाच आवडतं. मस्त थंडगार पावसाळ्यात काहीतरी गरमागरम आणि मजेदार खाण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खावेसे वाटते पण किचनमध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. तर काही मिनिटांत बनवा हे क्रिस्पी पोटॅटो स्नॅक्स. नोट करा याची सोपी रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिस्पी पोटॅटो स्नॅक्स साहित्य –

  • ४ उकडलेले बटाटे
  • १/४ कप कॉर्न फ्लोअर
  • किसलेले गाजर
  • हिरवे कांदे बारीक चिरलेले
  • मीठ
  • काळी मिरी अर्धा चमचा
  • चाट मसाला
  • बारीक केलेल्या लाल मिरच्या अर्धा चमचा
  • तेल तळण्यासाठी

क्रिस्पी पोटॅटो स्नॅक्स कृती

  • सर्वप्रथम बटाटे उकळून सोलून घ्या. ते थंड झाल्यावर मॅश करा. त्यात १/४ कप कॉर्न फ्लोअर घाला. तसेच गाजर, हिरवा कांदा घाला.
  • तुम्ही यात बीन्स, कोबी, स्वीट कॉर्न यांसारख्या हव्या त्या भाज्या किसून मिक्स कररू शकता.
  • आता त्यात मीठ, चाट मसाला, ठेचलेली लाल मिरची, काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. आता या मिश्रणाला मळलेल्या पीठाप्रमाणे गुळगुळीत करा.
  • आता याचे छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता. तुम्ही याचे गोल बॉल, अंडाकृती किंवा कटलेटसारखा आकार देखील देऊ शकता.
  • तुम्हाला हवे तर तुम्ही याचे एक लांब रोल तयार करून चाकूच्या साहाय्याने त्याचे लहान तुकडे करू शकता. त्याला एखाद्या काडीच्या मदतीने मध्ये मध्ये कट मारा आणि डिजाईन करा.

हेही वाचा – Palak Kabab: रात्रीच्या जेवणासाठी बनवा टेस्टी ”पालक कबाब”, जाणून घ्या सोपी मराठी रेसिपी

  • आता कढईत तेल गरम करून त्यात तयार बॉल टाका. ते सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. नंतर पेपर टॉवेलवर काढा आणि सर्व तेल शोषून घेऊ द्या. तुमचे क्रिस्पी पोटॅटो तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 minutes snacks recipe crispy potato bites crispy potato crispy recipe in marathi how to make crispy potato srk
First published on: 29-07-2023 at 17:06 IST