20 Minutes Medu Wada Recipe In Marathi: वीकेंड म्हटलं की नेहमीपेक्षा चांगला किंवा असं म्हणूयात हटके काहीतरी खायची इच्छा जास्त वाढते. सुट्टीची मजा घेताना जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ हल्ली ऑर्डरच केले जातात. पण एका वेळेनंतर सतत बाहेरचं खाऊन आता वेगळं काय खायचं असाही प्रश्न पडतो. तुमचीही अशीच अवस्था होत असेल तर आज आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळेत तयार होईल अशी मेदुवड्याची भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. युट्युबसह सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारं जोडपं म्हणजेच पूजा व शिरीष यांच्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या इन्स्टाग्राम पेजवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. सुरण ही आरोग्यासाठी उपयुक्त भाजी वापरून न वाटता- घाटता आपण मेदुवड्याचे पीठ कसे तयार करू शकता हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एरवी सुरणाची भाजी पटकन खाल्ली जात नाही पण या पद्धतीने आपण रेसिपी बनवल्यास टाळाटाळ करणारे शुद्ध आवडीने हा पदार्थ खातील.

सुरणाचे मेदुवडे करण्यासाठी साहित्य

उकळत्या सुरणासाठी
आवश्यकतेनुसार पाणी,
६०० ग्राम सुरण (सोलून फोड्या करून)
चवीनुसार मीठ,
¼ कप चणा डाळ, भिजवलेली

funny Republic Day Speech
Video : “२६ जानेवारी २५ जानेवारी नंतर येतो” चिमुकल्याच्या भाषणाने केला एकच दंगा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shocking video of lion started chasing buffaloes herd for hunt see what happened next thrilling hunting video went viral
VIDEO: “शिकार करो या शिकार बनो” सिंहाची चलाख चाल अन् म्हशीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a old man dance in the village on nachare mora ambyachya vanat marathi song video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गाण्यावर भर कार्यक्रमात आजोबांनी केला अजब डान्स; VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
Lakhat Ek Amcha Dada fame komal more atul kudale Kalyani choudhary dance on dada kondke song
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा दादा कोंडकेंच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: “तुझा संसार…”, दिव्याचे सत्य शिवासमोर आणण्यासाठी चंदन काय करणार? ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Shocking video jija sali kiss video went viral on internet users reacted watch viral kiss video
साली आधी घरवाली! वऱ्हाड्यांसमोर मेहुणीनं नवरदेवाला किस केलं अन् पुढच्याच क्षणी…; Video पाहून लावाल डोक्याला हात

सुरण वड्यांसाठी

३-४ हिरव्या मिरच्या, चिरलेल्या,
कढीपत्ता
1 टेस्पून जिरे
½ चमचे बेकिंग सोडा
१ इंच आले, चिरलेले,
1 टीस्पून कोथिंबीर, चिरलेली,
२ कप रवा (१ कप दह्यात भिजवलेला)
1½ लिंबाचा रस,
1 टीस्पून साखर,
¼ टीस्पून फ्रूट सॉल्ट,
चवीनुसार मीठ
तेल

कृती:

सर्वात आधी २ वाट्या रवा १ वाटी दह्यात भिजवत ठेवा.
मग सुरणाच्या साली कडून फोडी करून घ्या. या फोडी पाण्यात उकळायला ठेवा व त्यात भिजवलेली चण्याची डाळ, किंचित मीठ घाला. मिठामुळे सुरण पटकन शिजायला मदत होऊ शकते.
सुरण व डाळ शिजली की एका भांड्यात काढून लाटणं किंवा पळीने नीट घोटून घ्या. यामध्ये दह्यात भिजवलेला रवा घालून नीट मिसळून घ्या.
मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरे, कोथिंबीर, आलं, साखर, मीठ सगळं मिसळून घ्या.
शेवटी बेकिंग सोडा घालून मिसळून घ्या
मग तयार मिश्रणाला मेदुवड्याचा आकार देऊन तळून घ्या.

हे ही वाचा<< एक वाटी मूग डाळीने बनवा लुसलुशीत ‘कटोरी ढोकळा’! कुकरचीही गरज नाही पॅनमध्ये होईल काम, पाहा Video

ही हटके रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच रेड सॉईल स्टोरीजच्या या प्रसिद्ध जोडप्याने लोकसत्ताच्या ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ या सिरीजमध्ये मारलेल्या गप्पा सुद्धा आवर्जून पाहा.

Story img Loader