20 Minutes Medu Wada Recipe In Marathi: वीकेंड म्हटलं की नेहमीपेक्षा चांगला किंवा असं म्हणूयात हटके काहीतरी खायची इच्छा जास्त वाढते. सुट्टीची मजा घेताना जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ हल्ली ऑर्डरच केले जातात. पण एका वेळेनंतर सतत बाहेरचं खाऊन आता वेगळं काय खायचं असाही प्रश्न पडतो. तुमचीही अशीच अवस्था होत असेल तर आज आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळेत तयार होईल अशी मेदुवड्याची भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. युट्युबसह सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारं जोडपं म्हणजेच पूजा व शिरीष यांच्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या इन्स्टाग्राम पेजवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. सुरण ही आरोग्यासाठी उपयुक्त भाजी वापरून न वाटता- घाटता आपण मेदुवड्याचे पीठ कसे तयार करू शकता हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एरवी सुरणाची भाजी पटकन खाल्ली जात नाही पण या पद्धतीने आपण रेसिपी बनवल्यास टाळाटाळ करणारे शुद्ध आवडीने हा पदार्थ खातील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा