Limbu Pani Recipe for Summer: उन्हाळ्यात गरमीपासून आराम मिळवण्यासाठी बहुतेकांना लिंबूपाणी प्यायला आवडते. त्याचबरोबर लिंबू पाण्याचे सेवन उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता देखील कमी करते. तसे,लिंबू पाणी घरी तयार करणे खूप सोपे आहे. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक नाही तर तीन प्रकारे लिंबूपाणी तयार करुन पिऊ शकता, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढू लागते.
तुम्हाला साधे लिंबू पाणी पिऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी आम्ही लिंबू पाणी तयार करण्याची तीन नवीन पद्धती घेऊन आलो आहोत. या तिन्ही पद्धतीने लिंबू पाणी घरी सहज तयार करता येते. तुम्हाला थोडी वेगळी चव देखील मिळेल आणि उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम देखील मिळेल. चला तर मग जाणऊन घेऊ या
पुदीना लिंबू पाणी
उन्हाळ्यात पुदिना लिंबूपाणी तयार करण्यासाठी १/४ कप पुदिन्याची पाने, २ चमचे साखर आणि ५ चमचे लिंबाचा रस घ्या. यानंतर पुदिन्याची पाने आणि साखर बारीक करून पेस्ट बनवा. आता एका ग्लास पाण्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट मिक्स करा. नंतर त्यात लिंबाचा रस घाला आणि चमच्याने मिसळा. झालं!, तुमचं पुदिना लिंबूपाणी तयार आहे. लिंबाच्या काप करुन ग्लास सजवा आणि सर्व्ह करा
हेही जाणून घ्या : डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवणे का महत्वाचे आहे? जाणून घ्या ‘आयुर्वेद’ काय सांगते
मसाला लिंबू सोडा
मसाला लिंबू सोडा वापरण्यासाठी, एका ग्लासमध्ये 1 चमचे धणे पावडर, १/२ टीस्पून काळी मिरी पावडर, १ चमचे चाट मसाला, १ चमचे जिरे पावडर, १/2 टीस्पून काळे मीठ, १ चमचे पिठी साखर आणि ६ चमचे लिंबाचा रस घ्या. आता त्यात १ कप सोडा पाणी घालून चांगले मिसळा. नंतर त्यात बर्फाचा तुकडा घाला. बास! तुमचा मसाला लिंबू सोडा तयार आहे. आता थंड बर्फासह सर्व्ह करा.
नारळ लिंबू सरबत
उन्हाळ्यात लिंबू पाण्याची वेगळी चव चाखण्यासाठी तुम्ही नारळ लिंबू सरबज तयार करुन पाहू शकता. हे करण्यासाठी एका ग्लासमध्ये १ कप नारळ पाणी घ्या. आता त्यात ४ चमचे पिठीसाखर घाला. नंतर या मिश्रणात २ चमचे आल्याचा रस आणि ५ चमचे लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. आता ते थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. २ तासांनंतर तुमची स्वादिष्ट नारळ लिंबू सरबत तयार होईल आणि तुम्ही उन्हाळ्यात थंडगार नारळ लिंबू सरबताचा आनंद घेऊ शकाल.
हेही वाचा : हेल्दी अन् टेस्टी पनीर धिरडे, नाश्त्यापासून जेवणापर्यंत केव्हाही खाऊ शकता! जाणून घ्या रेसिपी
लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहित आहे. लिंबू पाणी पिण्यामुळे पचनासंबंधीत समस्या दूर होतात. लिंबामध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात आढळते जे हाडे मजबूत करण्यात मदत करते. जेवल्यानंतर लिंबू पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात याबाबत जाणून घेऊया.
लिंबू पाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते.