Bajari kheer recipe: सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांचे लक्ष बाहेरचे पदार्थ खाण्याकडे अधिक असते. त्यामुळे ते घरातील भाजी, चपाती खायला नकार देतात. शिवाय मुलं नेहमीच बाजरीची भाकरी कधीच आवडीने खात नाहीत. पण बाजरी आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे. अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी बाजरीची पौष्टिक खीर नक्कीच ट्राय करु शकता. ज्यामुळे खीरीच्या माध्यमातून त्यांना बाजरीचे देखील पोषकतत्व सहज मिळतील.
बाजरीची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१. ३ वाटी बाजरी
२. २ लिटर दूध
३. ४ वाट्या साखर
४. वेलदोड्याची पूड
५. १ बारीक वाटी बदामाचे काप
६. १ बारीक वाटी काजूचे काप
बाजरीची खीर बनवण्यासाची कृती :
१. सर्वात आधी ही खीर बनवण्याच्या आदल्या दिवशी रात्री बाजरी पाण्यात भिजत घालावी.
२. त्यानंतर सकाळी पाण्यातून काढावी आणि कपड्यावर पसरून सुकवून त्याची सालपटे टाकून घ्यावी.
३. दुसरीकडे दूध गरम करून त्यात बाजरी घालून ती ढवळत राहा.
४. बाजरी शिजली की त्यात साखर घालून आणि ढवळत राहावे.
५. खीर थोडी दाट झाले की गॅस बंद करुन ठेवा.
हेही वाचा: मँगो-रवा केकची सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा; नोट करा साहित्य अन् कृती
६. आता त्यावर वेलदोड्याची पूड ,बदाम, काजूचे काप घालावे
७. तयार खीर काही तासांसाठी फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा आणि नंतर सर्वांना सर्व्ह करा.