Wheat Panjiri Recipe: कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक ठिकाणी गव्हाची पंजिरी आवर्जून बनवली जाते. हा पदार्थ श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. हा पदार्थ चवीलाही खूप छान आणि कोणालाही आवडेल, असा आहे. चला तर मग गव्हाच्या पंजिरीची सोपी रेसिपी जाणून घेऊ.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
गव्हाची पंजिरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
- तीन कप गव्हाचे पीठ
- दीड कप तूप
- दीड कप साखर
- एक वाटी बदाम आणि काजू
गव्हाची पंजिरी बनविण्याची कृती:
- सर्वप्रथम तुपात गव्हाचे पीठ छान भाजून घ्या.
- त्यानंतर काजू, बदामाचे कापदेखील तुपात छान परतून घ्या.
- नंतर तुपामध्ये गव्हाचे पीठ, काजू, बदाम व साखर घालून एकजीव करून घ्या.
- तयार गरमागरम गव्हाच्या पंजिरीचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करा.
First published on: 26-08-2024 at 15:05 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A simple recipe for wheat panjiri for making an offering to lord krishna sap