रोज रात्री काय बनवायचे हा मोठा प्रश्न महिलांसमोर असतो. तुम्हालाही हा प्रश्न असेल तर डिनरमध्ये काहीतरी स्पायसी खायची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. नागपुरी स्पेशल अळूची भाजी रेसिपी नक्की ट्राय करा. अळूच्या पानामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रण राहते.
नागपुरी अळूची भाजी साहित्य
- ४ धोप्याची (अळूची पाने)
- १/४ वाटी चण्याची डाळ
- १/४ वाटी तुरीची डाळ
- १/४ वाटी मुगाची डाळ
- २ टेबलस्पून खोबऱ्याचे काप
- २ टेबलस्पून शेंगदाणे
- १ कांदा
- ६ लसूण पाकळ्या
- १ टीस्पून आमचूर
- १ टेबलस्पून गुळ
- १/२ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून तिखट
- १/४ टीस्पून हळद
- १/४ टीस्पून हिंग
- १ टेबलस्पून तेल
- १/२ टीस्पून गोडा मसाला
- १ टीस्पून आले
- २ टेबलस्पून कोथिंबीर
- ३ हिरव्या मिरच्या
- मीठ स्वादानुसार
नागपुरी अळूची भाजी कृती
- सर्वप्रथम धोक्याची पानं चांगली धूवून बारीक कापून घ्या. त्यांच्यासाठी देठ पण सोलून बारीक कापून घ्या कापून घ्या. खोबऱ्याचे बारीक काप करून घ्या. सर्व डाळी एकत्र धुऊन घ्या. कांदा आले लसूण कोथिंबीर व मिरची याची बारीक पेस्ट करून घ्या.
- आता कुकर च्या भांड्यामध्ये सर्व डाळी ठेवा. यात वरून कापलेली धोप्याची पाने टाका. आता यातच खोबऱ्याचे काप शेंगदाणे पाणी व हळद घालून कुकर मधून तीन शिटी करून घ्या.
- आताही शिजवलेली भाजी रवीने अलगद घोटून घ्या. आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल घाला. विश्वास या नंतर त्यात मोहरी घाला व हिंग घाला एक मिरची व लसुन घालून परता. आता वाटलेला मसाला घालावा. हा चांगला परतून घ्या.
हेही वाचा >> विदर्भाची खासियत म्हणजे चमचमीत कढईतील रोडगे; वाचा सोपी मराठी रेसिपी
- आता यात घोटलेली पातळ भाजी घाला. यात वरून तिखट व गोडा मसाला घाला. मीठ घाला. सर्वात शेवटी आमचूर व गूळ घाला उकळी येऊ द्या. कोथिंबीर घालून वरून तडका तेल टाकून गरम गरम भाजी पोळी पराठा भातासोबत सर्व्ह करा.