जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा गिलक्याची पातळ भाजी”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने आंबट चुक्याची पातळ भाजी ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबट चुक्याची पातळ भाजी साहित्य

  • १ मोठं भांड भरून आंबट चुक्याची निवडलेली पाने
  • १ वाटी मुगाची डाळ
  • १५ लसणाच्या पाकळ्या
  • १ इंच आलं किसलेलं
  • १/४ चमचा हळद
  • चमचा तिखट
  • ४ हिरव्या मिरच्या मधूनकापून दोन तुकडे केलेल्या
  • १ टेबलस्पून तेल
  • १/४ वाटी शेंगदाणे
  • १/४ वाटी खोबऱ्याचे पातळ कापलेले तुकडे
  • चवीनुसारमीठ
  • लिंबाएवढा गूळ
  • १/२ वाटी धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ चमचा हिंग,मोहरी चार-पाच मेथीदाणा व पाव चमचा हिंग

आंबट चुक्याची पातळ भाजी कृती

स्टेप १
धून भाजी बारीक चिरावी. डाळ शेंगदाने खोबर याचे काप पाण्यामध्ये भिजत ठेवावे. मग कुकर च्या भांडत मध्ये डाळ खोबरं शेंगदाणे व चिरलेली भाजी व मिरचीचे तुकडे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी.

स्टेप २
कुकर थंड झाला कि रवीच्या साहाय्याने भाजी घोटून घ्यावी मग कढई गॅसवर ठेवून गरम झाली की त्यामध्ये तेल घालावे हिंग,मोहरी, मेथ्या, ठेचलेला लसूण, किसलेलं आलं यांची खमंग फोडणी करावी त्यामध्ये हळद व तिखट घालावे मीठ व गूळ घालावा व घोटलेली भाजी व अर्धी कोथिंबीर घालावी.

हेही वाचा >> ढाबा स्टाईल दम अरबी ग्रेवी; अजिबात चिकट न होणारी अशी अरबीची भाजी नक्की बनवा

स्टेप ३
भाजी उकळत ठेवावी सहा सात मिनिटांनी मिश्रण घट्ट होऊन एकजीव होतं मग त्यामध्ये उरलेली कोथिंबीर घालून गरम भाताबरोबर कीव भाकरी बरोबर भाजी खावी अतिशय सुंदर व टेस्टी अशी भाजी लागते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aambat chuka patal bhaji recipe in marathi aambat chuka patal bhaji srk