Aamras Vati Recipe In Marathi: आंब्याचा सिझन नुकताच सुरू झाला आहे. बाजारात सगळीकडे आंबे आणि त्याचे विविध प्रकार दिसू लागले आहेत. अनेकांनी या वर्षीचा पहिला आंबा चाखलादेखील असेल. कोकणातून कुणी तुमच्यासाठी खास हापूस आंबे पाठवणार असतील तर यंदा केवळ आमरसावर थांबू नका. त्याच्याऐवजी आंब्याची ही नवीन रेसिपी ट्राय करा.

साहित्य

  • १ वाटी घरगुती बारीक शेवई
  • १ वाटी साखर
  • १ चमचा साजूक तूप
  • प्लास्टिक पेपर पीस
  • 1 किलो हापूस
  • २-३ चमचे साखर
  • घटपंना कमी जास्त साठी दूध
  • साजूक तूप पातळ

कृती

आमरस

आंबे पण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.

साले काढून फोडी करून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. फिरवताना साखर घालावी.

छान घट्ट रस तयार होईल. त्यात थोडे दूध घालून मिक्स करावे.

फ्रिजमध्ये ठेवल्यास ते गार राहिल.

आमरस वाटी

प्रथम थोड्या तुपात शेवई भाजून घेऊन काढून घ्या.

दुसऱ्या भांड्यात साखर भिजेल इतपत पाणी घालून पाक करा. यात भाजलेल्या शेवया घाला. थोडा घट्ट गोळा होऊ द्या. सर्व क्रिया पटपट करा.

वाटीला प्लास्टिक पेपर लाऊन त्यावर तूप लावा. ही तयारी आधीच करून ठेवावी. त्यात हा शेवयाचा गोळा घालून हाताने पटपट वाटीचा आकार द्यावा. पूर्ण २० मीं. थंड होऊ द्यावं.

आत्ता आपल्याला ही वाटी अगदी अलगद काढायची आहे. वाटी काढल्यावर त्यात थंडगार आंब्याचा रस घालून मस्त सर्व्ह करावे.

अगदी खूपच अप्रतिम चवीची आमरसवाटी तयार.