आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे खास करुन महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये जेवणात तोंडी लावणे हा महत्त्वाचा प्रकार. आपल्याकडे ताट वाढताना उजव्या बाजूला जितके महत्त्व असते तितकेच किंबहुना त्याहून थोडे जास्तच डाव्या बाजूला असते. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटणी, लोणचं, पापड, भजी असं काही ना काही या बाजूला असतंच. महाराष्ट्रात साधारणपणे नेहमीच्या जेवणात आपण दाण्याची, लसणाची, तिळाची, खोबऱ्याची, जवसाची, मिरचीचा खर्डा असे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार करतो. आज आपण करुयात ढाबा स्टाईल झणझणीत मिरची फ्राय
अचारी मिर्च फ्राय साहित्य
७,८ मोठ्या आकाराच्या मिरच्या
२,३ हिरवी मिर्च
१ सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल
चिमूटभर हिंग
२ चम्मच,पंच मसाला घाला (आजवाईन, जिरे, कलोंजी, मेथी, सौफ आणि मोहरी)
१/२ , १/२ tsp हळद आणि धनेपूड, मीठ
१ चमचा कोणतेही लोणचे
अचारी मिर्च फ्राय कृती
१. प्रथम मोठ्या आकाराच्या मिरच्या स्वच्छ करा आणि धुवा नंतर मधोमध कापून घ्या किंवा दोन भाग करा.
२. नंतर तळण्याचे पॅन गरम करा आणि एक सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल घाला आणि नंतर त्यात चिमूटभर हिंग आणि पचं मसाला घाला (आजवाईन, जिरे, कलोंजी, मेथी, सौफ आणि मोहरी). घाला.
३. तडतडल्यावर त्यात दोन चिरलेल्या मिरच्या आणि हळद आणि धनेपूड, मीठ घाला. मग एक चमचा कोणतेही लोणचे घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची टाका आणि नीट ढवळून झाल्यावर पॅनचे झाकण झाकून ठेवा.
हेही वाचा >> जास्त मेहनत न घेता, फक्त १५ मिनिटांत बनवा “पनीर लबाबदार” चव हॉटेलपेक्षा भारी- आणि रेसिपी सुपरफास्ट
४. तीन मिनिटांनंतर, ते ढवळून पुन्हा चार मिनिटे शिजवा ते सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd