प्रशांत ननावरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिल्लीत गेल्यावर काय आणि कुठे खायचं हे ठरलेलं असतं. पण त्याव्यतिरिक्त नवं काही हवं असेल तर लाजपत नगरला नक्की भेट द्या. तिथली भल्ला पापडी आणि राम लड्डू प्रसिद्ध आहेतच, पण आणखी एक खास ओळख म्हणजे ‘मिनी काबूल’. फाळणीच्या वेळी अफगाण निर्वासित येथे स्थिरावले. आजघडीला निर्वासितांसाठीच्या संयुक्त राष्ट्र उच्चायुक्तांकडे १४,५०० निर्वासितांची नोंद आहे, त्यातील बहुसंख्य निर्वासित या भागात राहतात.
काबुली खाद्यसंस्कृतीचा स्वाद घ्यायचा असेल तर ‘काबूल दिल्ली’ या रेस्टॉरंटला भेट द्यायला हवी. येथील पदार्थ तयार करण्याची पद्धत, त्यासाठी वापरले जाणारे मसाले आणि एवढंच काय तर त्याचं सादरीकरणही विलक्षण आहे.
टेबलावर बसल्यावर पहिल्यांदा डो (Dough) हे ताकासारखं थंडगार पेय समोर आणून ठेवलं जातं. यामध्ये काकडीचा कीस आणि सुकलेला पुदिना बारीक करून टाकलेला असतो. स्टार्टर म्हणून कबाब चोपानला पर्याय नाही. त्यानंतर थेट इराणचा जगप्रसिद्ध काबुली पुलाव मागवावा. कमीत कमी मसाल्यांमध्ये इतका चवदार पुलाव कसा करता येऊ शकतो हे खरं तर न सुटणारं कोडं आहे. शाकाहारींठीही सलाड टर्कीश आणि बोरानी बंजान हे चविष्ट पदार्थ आहेत. कबाब किंवा करीसह खायला आयताकृती चपटा अफगाण ब्रेडही मागवता येतो. गोड पदार्थात इथे ग्रीन टी आणि ब्लॅक टी असे दोन पर्याय आहेत. ते इतर टीपेक्षा वेगळे का आहेत याची प्रचीती त्याचा घोट घेतल्याशिवाय येणार नाही. त्यामुळे दिल्लीला गेल्यास या मिनी काबूलला भेट द्यायला विसरू नका.