Aloo Palak Paratha Recipe : सोशल मीडियावर रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही रेसिपी या अतिशय हटके असतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा घरी हे पदार्थ बनवण्याची इच्छा होते.
सध्या हिवाळा सुरू आहे. बाजारात हिरव्या पालेभाज्या दिसत आहे. हिवाळ्यात पालेभाज्या आवडीने खाल्ल्या जातात. पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. याच्या सेवनाने हिवाळ्यात रोग प्रतिकारशक्ती वाढते. तुम्ही कधी आलू पालक पराठा खाल्ला आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलू पालक पराठा कसा तयार करायचा, याविषयी सांगितले आहे. आज आपण ही हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. (Aloo Palak Paratha recipe Winter Special how to make Aloo Palak Paratha video goes viral on social media)

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
neha gadre marathi actress announces pregnancy
इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

साहित्य

  • उकडलेल बटाटे
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेली मिरची
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • आल्याची पेस्ट
  • लाल तिखट
  • मीठ
  • आमचूर पावडर
  • हिंग
  • कणीक (गव्हाचे पीठ)
  • पालकची पेस्ट

हेही वाचा : Stuffed Shimla Mirchi : दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवा ‘भरलेली सिमला मिरची’; झटपट, झणझणीत सोपी रेसिपी नक्की वाचा

कृती

  • सुरुवातीला बटाटे उकडून घ्या
  • उकडलेले बटाटे सोलून घ्या
  • बटाच्याची बारीक पेस्ट करा.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची, आणि कोथिंबीर टाका.
  • त्यानंतर आल्याची पेस्ट टाका.
  • त्यानंतर लाल तिखट, हिंग, मीठ, आमचूर पावडर टाका.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर कणीक घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि पालकची पेस्ट टाकाय
  • कणीक नीट मळून घ्या.
  • पालक एकत्रित केलेल्या कणकीपासून पोळी तयार करा.
  • या पोळीमध्ये बटाट्याचे मिश्रण भरा.
  • त्यानंतर पुन्हा पराठा लाटा.
  • हा पराठा गरम तव्यावर टाका आणि तुपासह भाजून घ्या
  • तुमचा गरमागर आलू पालक पराठा तयार होईल.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. अनेकांना हा आलु पालक पराठा घरी तयार करण्याची इच्छा होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Hair loss: नेहमीपेक्षा जास्त केस गळतात? मेथीचा ‘हा’ पुलाव तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि फरक पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

_cookingbaaz या इन्स्टाग्राम अकाउंटवरूवन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हिवाळा स्पेशल आलू पालक पराठा”

हेही वाचा : How To Make Soya Cutlet : सोयाबीन कटलेट कधी खाल्ले आहेत का? मग मुलांच्या डब्यासाठी नक्की बनवा; पटकन वाचा सोपी रेसिपी

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इंटरनेटवरील सुंदर सुंदर व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “पालकऐवजी मेथी टाका. खूप चविष्ठ वाटतो. आणखी एका युजरने लिहिलेय, “टेस्टी आहे आणि हेल्दी आहे” अनेक युजर्स नी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.