Aloo Paneer Donuts Recipe : डोनटस् खायला लहान मुलांना भरपूर आवडतात. आकार लहान असला तरी अनेक रंगांमध्ये उपलब्ध असणारे, साखरेत घोळलेले हे डोनट्स खायला जितके स्वादिष्ट असतात, तितकेच दिसायला खूप आकर्षक सुद्धा असतात. त्यामुळे डोनट्स खाण्यासाठी ते वारंवार निमित्त शोधलं जाते. पण, मैद्यापासून बनवलेलं डोनट्स मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा ठरू शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर एका युजरने टेस्टी आणि हेल्दी डोनट्स बनवण्याची एक खास रेसिपी व्हिडीओत दाखवली आहे. या रेसिपीच नाव आहे ‘बटाटा, पनीरपासून बनवलेले डोनट्स’ (Aloo Paneer Donuts). तर हा पदार्थ कसा बनवायचा चला पाहू.
साहित्य (Aloo Paneer Donuts Ingredients )
तीन ते चार उकडलेले बटाटे
एक कप किसलेला पनीर
१/४ मक्याचे पीठ
एक चमचा ओरेगॅनो
एक चमचा चिली फ्लेक्स
स्लरीसाठी (२ ते ३ चमचे मैदा + १/४ कप पाणी)
कोटिंगसाठी ब्रेड क्रंब्स
चवीनुसार मीठ
तेल
व्हिडीओ नक्की बघा…
कृती (How To Make Aloo Paneer Donuts)
एका भांड्यात उकडलेले बटाटे, किसलेले पनीर, कॉर्न फ्लोअर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घाला.
सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याचे पीठ मळून घ्या.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे गोळे करून घ्या आणि त्याला डोनटचा आकार द्या.
नंतर डोनट स्लरीमध्ये बुडवा आणि नंतर ब्रेड क्रंब्सने कोट करा.
त्यानंतर डोनट्स तेलात तळून घ्या.
अशाप्रकारे तुमचे बटाटा, पनीरपासून बनवलेले डोनट्स तयार (Aloo Paneer Donuts).
डोनट्स तुमच्या आवडत्या सॉस किंवा चटणीबरोबर खा आणि आनंद घ्या.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @noobchef_in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लहान मुलांना सकाळी आणि संधयाकाळी नाश्त्यासाठी नवनवीन पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी घरच्या घरी एखादा पदार्थ बनवून तुम्ही त्यांची भूक भागवू शकता आणि त्यांना हेल्दी सुद्धा खायला देऊ शकता. यासाठी तुम्ही नक्की बटाटा, पनीरपासून बनवलेले डोनट्स बनवून बघा आणि लहान मुलांना आवर्जून खायला द्या.