कुटुंबातील सदस्यांच्या डब्याला कोणती भाजी द्यायची हे सुचतं नसल्यास ‘बटाटा’ हा पर्याय तर कोणत्याही नावडत्या भाजीत बटाटा टाकलाय की, त्याची चव आपसूकचं वाढते यात काही खंत नाही. तुम्ही आतापर्यंत बटाटा भजी, बटाटा भाजी, बटाट्याचे काप, बटाटे वडा नक्कीच खाल्ला असेल. पण, तुम्ही कधी ‘स्टफ पोटॅटो’ खाल्ला आहे का ? नाही… तर आज आपण या पदार्थाची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य –

  • बटाटे – ६
  • गाजर – १
  • १/४ कप वाटाणे
  • १/४ कप घेवडा
  • १/२ कप दही
  • एक चमचा सोया सॉस
  • २ कप व्हाईट सॉस
  • चीज क्युब्स
  • लाल तिखट, काळी मिरी
  • कांदा
  • मीठ

हेही वाचा…‘मोकळा झुणका’ कधी खाल्ला आहे का? प्रवासातही बिनधास्त घेऊन जाऊ शकता; रेसिपी लगेच नोट करा

कृती –

  • बटाटे उकडवून घ्या. (थोडे कमी उकडवा)
  • गाजर, घेवड्याचे लहान तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर गाजर,मटार, घेवडा उकडवून घ्या.
  • प्रत्येक बटाट्यात मिश्रण राहील अशी जागा ठेवा. (बटाटा पोकळ करा)
  • नंतर कांदा चिरून घ्या.
  • एक कढई घ्या त्यात कांदा फोडणीला टाका. नंतर त्यात गाजर,मटार, घेवडा, लाल तिखट, सोया सॉस, बटाट्याच्या आतील काढून घेतलेले बटाट्याचे काही कण, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • मिश्रण गार झाल्यावर बटाट्यात भरून घ्या.
  • व्हाईट सॉसमध्ये दही, मीठ, काळी मिरी पावडर व किसलेलं चीज टाका.
  • त्यानंतर स्टफ करून घेतलेलं बटाटे एका प्लेटमध्ये घ्या. त्याच्यावरून व्हाईट सॉस टाका व ओवनमध्ये लालसर बेक करून घ्या. अशाप्रकारे तुमचा ‘स्टफ पोटॅटो’ तयार.