How to make soyabin ki bhaji सोयाबीन हा प्रोटीन्सचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. आहारतज्ज्ञही जेवणात सोयाबीनचा समावेश करण्याचा सल्ला आवर्जून देतात.जे लोक शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करतात त्यांच्यासाठी सोयाबीन म्हणजे पोषक तत्वांचा खजिनाच आहे. रोज रोज पालेभाज्या, फळभाज्या खाऊन कंटाळा आला की पनीर,मशरूम, सोयाबीन खाल्ल्यास तेव्हढाच बदल मिळतो. हॉटेलस्टाईल सोयाबीनची ग्रेव्ही बनवणं सर्वांनाच जमतंच असं नाही. सोयाबीनची भाजी बनवण्याची योग्य पद्धत आणि मसाले कोणते वापरायचे याची कल्पना असेल तर भाजी चव दुप्पटीनं वाढेल.दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठीही तुम्हीही भाजी बनवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलू-सोया चक्सं भाजी रेसिपी

  • २ कप सोयाचे तुकडे
  • २-३ चिरलेले बटाटे
  • १ कांदा,
  • १ मोठे आले
  • आणि तीन चार मिरच्या,
  • १ पूर्ण लसूण
  • २ मोठ्या आकाराचा टोमॅटो
  • २ सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल
  • १ चमचा मोहरी
  • १ टीस्पून जीरे
  • हिंग पिचं आफ
  • १-१ टीस्पून धणे आणि हळद,
  • १/२ टीस्पून मिरची पावडर
  • १/२ टीस्पून किचन किंग गरम मसाला
  • १/२ टीस्पून पावभाजी मसाला
  • मीठ चवीनुसार
  • १ अणि १/२ ग्लास पाणी
  • चिरलेली कोथिंबीर सर्व्ह करण्यासाठी

आलू-सोया चक्सं भाजी कृती

स्टेप १
प्रथम दोन कप सोयाचे तुकडे आणि २-३ चिरलेले बटाटे उकळवा.

स्टेप २
प्रथम दोन कप सोयाचे तुकडे आणि दोन दोन चिरलेले बटाटे ५ मिनिटे उकळवा.

स्टेप ३
नंतर एक कांदा, एक मोठे आले आणि तीन चार मिरच्या, एक पूर्ण लसूण बारीक करून घ्या.आणि २ मोठ्या आकाराचा टोमॅटो थोडासा वेगळा मिसळा.

स्टेप ४
नंतर पॅन गरम करा आणि दोन सर्व्हिंग स्पून मोहरीचे तेल गरम करा. नंतर त्यात एक चमचा मोहरी आणि जीरे, हिंग टाका.मग बारीक केलेला लसूण आणि आले पेस्ट घाला.

स्टेप ५
भाजून घ्या मग धणे आणि हळद, मिरची पावडर एक एक करून भाजून घ्या. मग मीठ आणि किचन किंग गरम मसाला घाला. छान ढवळा.

स्टेप ६
नंतर पावभाजी मसाला घालून नीट मिक्स करून झाकण झाकून ठेवा.पाच मिनिटे शिजवा.

स्टेप ७
नंतर झाकण उघडा आणि त्यात ग्राइडं टोमॅटो घाला आणि चांगले मिसळा आणि तीन मिनिटे शिजवा. नतरं सोया चक्सं अणि बटाटा घाला,मिक्स करा, तीन मिनिटं शिजवा.

हेही वाचा >> झणझणीत चटकदार वऱ्हाडी लसणाची चटणी; अस्सल वऱ्हाडी पद्धतीनं करा आजचा बेत

स्टेप ८
नतरं १/२ ग्लास पाणी घाला आणि सहा मिनिटे शिजवा मग झाकण बंद करा.

स्टेप ९
नंतर झाकण उघडून तीन मिनिटे मोकळ्या स्थितीत भाजून घ्या आणि गॅस बंद करा. चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aloo soya chunks bhaji recipe in marathi soya bhaji recipe in marathi srk