Alu Vadi Recipe : सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्ष हा १५ दिवसांचा असतो. या दिवसांमध्ये पितरांची पूजा केली जाते. त्यांना नैवद्य दाखवला जातो. पितृपक्षात श्राद्धाच्या नैवद्यासाठी खास जेवण बनविले जाते. या नैवद्याच्या ताटात अनेक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक पदार्थांचे वेगळे महत्त्व असते. पितृपक्षात अळू वडी सुद्धा बनवली जाते. आज आपण कुरकुरीत अळू वडी कशी बनवायची? हे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • अळूची पाने
  • बेसन
  • पांढरे तीळ
  • कढीपत्ता
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
  • ओलं खोबरं
  • जिरे
  • हळद
  • हिंग
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : पितृपक्षाच्या नैवद्यासाठी अशी करा कुरकुरीत घोसाळ्याची भजी, ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

कृती

  • बेसनात जिरे, तीळ, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता टाका
  • त्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका
  • हे मिश्रण घट्ट भिजवून घ्या.
  • अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या
  • पानाच्या मागील भागावर हे मिश्रण टाका. त्यावर दुसरे पान उलटे ठेवा आणि हे मिश्रण हाताने नीट पसरून घ्या.
  • अशाप्रकारे एकावर एक 4 पानांवर मिश्रण लावा आणि हे चारही पाने दुमडून रोल करा.
  • रोल करताना सुद्धा मिश्रण लावा.
  • कूकरचे भांडे घ्या त्या भांड्याला नीट तेल लावा आणि हा रोल १० -१५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. (सुचना- कुकरला शिट्टी लावू नये)
  • कुकरमधून बाहेर काढल्यानंतर या रोलचे छोटे छोटे काप करावेत
  • आणि हे काप गरम तेलातून तळून घ्यावे.
  • सर्व्ह करताना त्यावर ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर टाकावी.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alu vadi recipe how to make crispy alu vadi in pitru paksha food thali recipe food news in marathi ndj
Show comments