Alu Vadi Recipe In Marathi: संध्याकाळ झाल्यावर लोक कामावरुन घरी यायला निघतात. ट्रेनने प्रवास करुन घरी पोहचल्यावर गरमागरम चहाबरोबर काहीतरी खायला मिळालं तर ते संपूर्ण दिवसाचा थकवा नाहीसा होतो. नोकरदारांप्रमाणे लहान मुलंदेखील ५-६ च्या सुमारास शाळेतून घरी येतात. घरात पाऊल ठेवल्या-ठेवल्या ‘आई भूक लागलीये’ या वाक्याने त्यांच्या बोलण्याची सुरुवात होते. अशा वेळी त्यांना काहीतरी रुचकर आणि पौष्टिक असा पदार्थ खाऊ घालायचा विचार आईच्या मनात येत असतो. अशा वेळी शाळेतून येणाऱ्या लहान मुलांपासून नोकरीवरुन येणाऱ्या वयस्करांपर्यंत सर्वांसाठी अळूच्या पातवड्या (अळूच्या वड्या) हा पदार्थ बनवू शकता. घरातल्या मंडळींना खूश करण्यासाठी गृहिणींना थोडीशी मदत म्हणून या पदार्थांची सोपी रेसिपी आम्ही खास लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील घेऊन आलो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • अळूची पाने ३
  • १ वाटी हरभरा डाळ
  • अर्धा नारळ
  • अर्धी वाटी चिंचेचा कोळ
  • १ कांदा
  • १ कोथिंबिरीची जुडी
  • ३ हिरव्या मिरच्या
  • अर्धा इंच आलं
  • अर्धा चमचा हळद
  • १ मोठा चमचा लाल तिखट
  • एक मोठा चमचा जिरे
  • तूप
  • ३-४ चमचे तेल
  • पाणी
  • मीठ चवीनुसार

कृती :

  • अळूची पाने धुवा, देठ काळजीपूर्वक चिरा.
  • हरभरा डाळ रात्रभर भिजवा. डाळ, मिरची आणि आलं वाटा.
  • त्यात इतर सर्वसाहित्य, मसाला घाला. त्या मिश्रणाचे (मसाल्याचे) तीन भाग करा.
  • पाने पालथी घ्या, गडद हिरवा रंग खाली करा.
  • चिंचेचे पाणी पानांना लावा, मसाला घातलेले पीठ पानांना लावा.
  • तीनही पानांना सात-आठ वेळा पीठ लावा.
  • पाने गुंडाळा आणि वीस मिनिटे उकडा.
  • उंडा गार झाल्यावर त्याचे तुकडे करा.
  • तेलावर कुस्करीत व सोनेरी होईपर्यंत परता.
  • चटणी व लिंबाच्या फोडीबरोबर वाढा.

आणखी वाचा – पौष्टिक कोळंबीपासून बनवा कुरकुरीत, मसालेदार कोळंबी कोळीवाडा; सोपी रेसिपी लगेच करा नोट

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alu vadi recipe in marathi how to make alu vadi in maharashtrian style know more yps
First published on: 03-05-2023 at 18:22 IST