डॉ. सारिका सातव
साहित्य
* आवळे-एक किलो
* साखर-साडेतीन कप
कृती :
* आवळे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यावेत.
* एका मोठय़ा पातेल्यात पाणी उकळत ठेवावे.
* उकळत्या पाण्यात आवळे टाकून पाच ते १० मिनिटे ठेवावे.
* गॅस बंद करून एका चाळणीत आवळे काढावेत.
* आता सुरीने आवळय़ाच्या फोडी सहजतेने होतात. बी काढून टाकावे.
* पूर्ण थंड झाल्यानंतर आवळय़ाचे तुकडे आणि तीन कप साखर मिसळून ठेवून द्यावे.
* अधूनमधून हलवत राहावे.
* दोन ते तीन दिवसांनंतर आवळय़ाचे तुकडे जेव्हा भांडय़ाच्या तळाशी बसतात, तेव्हा काढून घेऊन चाळणीत घ्यावे.
* द्रव सगळा निथळून गेल्यानंतर उन्हात वाळवावे.
* पिठीसाखर चाळून पूर्णत: वाळवावे.
नंतर हवाबंद डब्यात भरावेत.
वैशिष्टय़े
* ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात.
* रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.
* त्वचा, केस, पचनशक्ती, डोळे यांच्यासाठी अतिशय उपयुक्त.