आवळ्याचे फायदे आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहेत, त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. आवळ्याचे पोषणमूल्य पाहता त्याला सुपरफूड असेही म्हणतात. आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. आपले आरोग्य चांगले राहते. आयुष्य वाढण्यास मदत होते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबतात मध मिसळले तर अधिक चांगले. तसेच आवळा ज्यूसमुळे महिलांची पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर हा आवळा सरबत घरच्या घरी कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहुयात.

आवळा सीरप साहित्य

Chana Jor Garam Bhel perfect recipe for evening
‘चना जोर गरम भेळ’ संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट रेसिपी; नोट करा साहित्य आणि कृती
Carrot rise recipe Gajracha Bhat Recipe In Marathi
रात्रीच्या जेवणाचा चमचमीत बेत; रुचकर मऊ आणि लुसलुशीत गाजराचा भात, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी
Makhana Bhel
संध्याकाळी चहाबरोबर चटपटीत अन् हेल्दी मखाणा भेळ खा, एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या रेसिपी, Video Viral
easy recipe from only four onions
VIDEO : घरात भाजी नसेल तर टेन्शन घेऊ नका; ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
Make Soybean Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा चमचमीत ‘सोयाबीन कबाब’; नोट करा साहित्य आणि कृती
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
palak idli recipe
Palak Idli : नाश्त्याला झटपट बनवा पौष्टिक पालक इडली; लगेच रेसिपी नोट करा
Sunday Special Pohe Tasty Nuggets for breakfast
संडे स्पेशल नाश्त्यासाठी ‘पोह्याचे टेस्टी नगेट्स’; पटकन लिहून घ्या साहित्य अन् कृती

१ किलो आवळे
१ किलो साखर
५० ग्रॅम आले
६ लिंबे
३ कप पाणी
१ ग्लास सरबत सामग्री :-
२ टे स्पून आवळा सीरप
१ चिमुटभर मीठ
१ ग्लास थंड पाणी
पाचक सुपारी :-
आवळा, आल्याचा निघालेला चोथा
मिठ चवीनुसार
जीरे पूड (आॅप्शनल)

आवळा सीरप रेसिपी

१. आवळे, लिंबू, आले स्वच्छ धुवून पुसून घ्यावे आले सोलून घ्यावे, लिंबू कापून बिया काढाव्या.

२. आले, आवळे खिसावे. लिंबाचा रस काढून घ्यावा.

३. आता मिक्सरच्या भांड्यात थोडा थोडा आवळ्याचा व आल्याचा खिस व लिंबाचा रस घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हे वाटण एका भांड्यावर स्वच्छ रुमाल ठेवून वस्त्रगाळ करून रस काढावा.

४. आता निघालेल्या रसाचाच वापर पुढील वाटण करताना करावा. आले व लिंबाच्या एकत्रीतपणामुळे निघालेला रस हलका लालसर होतो म्हणून त्यात हिरवा फुड कलर घालून चांगले मिक्स करावे.

५. एका भांड्यात साखर व तीन कप पाणी घालून एक तारी पाक करावा. पाक कोमट झाल्यावर त्यात आवळा, आल्याचा रस गाळून ओतावा. मिश्रण चांगले ढवळावे.

६. तयार सीरप स्वच्छ बाटलीत भरून वर्षभरासाठी स्टोअर करावे. निघालेला चोथा टाकून न देता त्यात सैंधव मीठ,जीरे पूड घालून सुकवून पाचक सुपारी तयार होते. किंवा रोजच्या जेवणात भाजी, आमटी एक एक चमचा हा चोथा वापरल्यास त्याचे पोषण मुल्य मिळते.

७. सरबत तयार करण्यासाठी एका ग्लास मधे २टी स्पून आवळा सुपारी घालून त्यात थंड पाणी व चिमुटभर मीठ घालून चांगले मिक्स करावे.

हेही वाचा >> पौष्टिक आणि खमंग मेथी गाजर पराठा रेसिपी! कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी…

८. अतिशय पौष्टिक व पाचक आवळा सरबत थंड थंड सर्व्ह करावे.