Chicken masala fry recipe: रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांना चिकनसारखे विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. मग ते ग्रील्ड चिकन असो की चिकन करी किंवा मसाला चिकन किंवा चिली चिकन, या पदार्थांचा आस्वाद मांसाहारी प्रेमी मोठ्या थाटामाटात घेतात. तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल चमचमीत अशी चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृतसरी चिकन मसाला साहित्य

१ किलो चिकन

१ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ टीस्पून कसुरी मेथी

१ टीस्पून धने पावडर

१ टीस्पून डेगी लाल मिरची पावडर

१/२ टीस्पून हळद, २ चमचे तूप

२ टेबलस्पून दही फेटलेले

दीड टीस्पून तेल, मीठ चवीनुसार

चिकन मसाला बनवण्यासाठी

२ चमचे काळी मिरी, १ टेबलस्पून धणे

२ मोठी वेलची, १ हिरवी वेलची

३-४ लवंगा, १/४ टीस्पून मेथी दाणे

१/४ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून मोहरी

१ टेबलस्पून तळण्यासाठी तेल

२ तमालपत्र, २ हिरव्या मिरच्या

३ मध्यम आकाराचे कांदे चिरलेल

२ मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो

२ मोठे चमचे दही फेटलेले

१ टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली

१/२ टेबलस्पून बटर

अमृतसरी चिकन मसाला कृती

१. अमृतसरी चिकन मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकन मॅरीनेट करून घ्या. यासाठी एका भांड्यात चिकन, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, धने पावडर, तिखट, हळद, तूप, चवीनुसार मीठ, दही घ्या. त्यात तेल घाला आणि चांगले मिक्स करा. मॅरीनेट होण्यासाठी २०-३० मिनिटे बाजूला ठेवा.

२. आता अमृतसरी चिकन मसाला बनवण्यासाठी काळी मिरी, धणे, काळी वेलची, हिरवी वेलची, लवंगा, मेथी दाणा, जिरे आणि मोहरी मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर बनवा. तर दुसरीकडे चिकन भाजण्यासाठी तव्यावर तेल गरम करून त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून दोन्ही बाजूंनी मऊ होईपर्यंत भाजून घ्या आणि वेगळ्या भांड्यात ठेवा.

३. चिकन भाजण्यासाठी प्रथम एका खोलगट भांड्यात तेल टाकून गरम करा. आता तेलात तमालपत्र, हिरवी मिरची, कांदा, बटर घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परता. आता तयार केलेला मसाला, टोमॅटो घालून चांगले परतून घ्या.

हेही वाचा >> खानदेशी स्पेशल कोंडाळे; गव्हाच्या पिठापासून बनवा खुसखुशीत नाष्टा, ही घ्या सोपी मराठी रेसिपी

४. यानंतर पाणी, दही, चवीनुसार मीठ घालून एक मिनिट चांगले शिजवा. आता त्यात भाजलेले चिकन घालून चांगले भाजून घ्या. आता यात आणखी थोटे पाणी घालून चिकन मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे शिजवा. यानंतर त्यात थोडे बटर आणि कोथिंबीर घाला. तुमचं चविष्ट अमृतसरी चिकन तयार आहे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून कोथिंबीरीने सजवा.