Ananasache Sambhare Recipe In Marathi: कोकणामध्ये अननसाची कढी हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. या पदार्थाला काहीजण अननसाचे सांबारे असं म्हणतात. आपल्याकडे बऱ्याच घरांमध्ये कढी या पदार्थाचा समावेश जेवणात केला जातो. पण कधीतरी साधी कढी खाऊन कंटाळू येऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायची इच्छा होत असेल, तर तुम्ही अननसाचे सांबारे (अननसाची कढी) हा पदार्थ बनवू शकता. मिरच्या टाकून तुम्ही तिखट कढी बनवू शकता. तर नारळ, दूध आणि गूळ वापरुन गोड अननसाचे सांबारे बनवता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य –

  • १ अननस
  • १ ताजा नारळ
  • अर्धा चमचा हिंग
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • २ मोठे चमचे बेसन
  • १ मोठा चमचा साखर
  • ५० ग्रॅम काजू
  • एक वाटी पाणी
  • मीठ चवीनुसार

कृती –

  • अननसाचे छोटे, तुकडे करा. त्यात पाणी, हिंग, गरम मसाला घाला व उकळायला ठेवा.
  • खोबरं खवून घ्या. घट्ट दूध व पातळ दूध काढा. पातळ दुधात बेसन घाला.
  • अननसाचे तुकडे शिजल्यावर त्यात बेसन घातलेले नारळाचे पातळ दूध मिसळा.
  • बेसन शिजल्यावर नारळाचे घट्ट दूध घाला. काजू आणि साखर घाला.
  • अननस जर आंबट असेल तर अजून साखर घाला.
  • चवीप्रमाणे मीठ घाला. एक उकळी येऊ द्या.. सांबारे खायला तयार.

Summer Special: ४-५ दिवसांमध्ये बनवा वर्षभर पुरतील इतक्या गव्हाच्या कुरडया; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)