How To Make Coffee Walnut Modak : गणेशोत्सवात जेवढी मज्जा बाप्पाच्या आगमनाची असते. तितकीच मजा रोज कोणत्या फ्लेवरचे मोदक बनवायचे याची उत्सुकता सुद्धा असते. या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पामुळे आपल्यालाही चाखायला मिळाले. बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे सेवा करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपण खूप आनंदाने करतो. तर उद्या अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi 2024) आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. तर शेवट गोड व्हावा यासाठी आपण आज कॉफी-अक्रोडचे आगळेवेगळे मोदक बनवणार आहोत. तर कसे बनवायचे हे वेगवेगळे मोदक चला पाहूयात…

साहित्य :

१. अक्रोड १/४ कप
२. दूध पावडर १ कप
३. मिल्कमेड १/४ कप
४. दूध १/४ कप
५. कॉफी १/२ चमचा
६. कोको पावडर १ चमचा
७. तूप १ चमचा
८. कोटिंगसाठी चिरलेला अक्रोड

dirty lemone juice making video viral
तुम्ही रस्त्यावर लिंबू सरबत पिताय? मग हा किळसवाणा Video पाहाच, पुन्हा पिण्यापूर्वी विचार कराल १०० वेळा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Bigg Boss Marathi Season 5 contestants emotional after seeing the special gifts given by Ritesh Deshmukh
Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने दिलेले खास गिफ्ट्स पाहून स्पर्धकांचे डोळे पाणावले, पाहा नवा प्रोमो
Five Ganpati Decoration Ideas for Home Ganpati
Ganpati Decoration Ideas 2024 : मोजकं सामान वापरून करा बाप्पासाठी ‘असं’ खास डेकोरेशन; ऐनवेळी झटपट सजावट करण्यासाठी स्वस्तात मस्त पाच टिप्स
incomplete tar road from Bulgaria or india fact check
भ्रष्टाचाराचा कळस, वाहनाचे चाक जाण्यापुरते केले डांबरीकरण; Viral Photo नेमका कुठला? घ्या जाणून
brother-sister making reel viral video
अय्या, किती गोड! रील बनवता बनवता भावा-बहिणीचं सुरू झालं भांडण; VIDEO पाहून येईल हसू
Heartwarming Video of Strangers Helping US Girl To Find Lost Earring
“हरवलेले कानातले नाही; पण चांगली माणसं भेटली” तरुणीने शेअर केला हृदयस्पर्शी अनुभव, VIDEO पोस्ट करीत म्हणाली…
Anand Mahindra shares mosquito killing device
Anand Mahindra: पावसाळ्यात डासांपासून संरक्षण कसं करावं? मुंबईकरांना आनंद महिंद्रांनी सुचवला उपाय; मशीनद्वारे डास पकडण्याची दाखवली टेक्निक

हेही वाचा…Modak Recipe : फक्त १५ ते २० मिनिटांत बाप्पासाठी करा मोदक; तोंडात टाकताच विरघळतील; रेसिपी पटकन लिहून घ्या

पोस्ट नक्की बघा…

कृती :

१. सुरवातीलाएका पॅनमध्ये अक्रोड घ्या.
२. नंतर त्यात मिल्क पावडर, मिल्कमेड घाला.
३. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
४. त्यात दूध घालून मिक्स करा. अशाप्रकारे तुमचे मिश्रण घट्ट होईल.
५. त्यानंतर त्यात कॉफी व कोको पावडर घाला.
६. मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या आणि मंद आचेवर १ ते २ मिनिट गरम करून घ्या आणि त्यात तूप घाला.
७. मिश्रण तयार झाल्यावर त्यात कोटिंगसाठी चिरलेला अक्रोड घाला. अशाप्रकारे तुमचे मोदक बनवण्यासाठीचे मिश्रण तयार.
८. त्यानंतर मोदक बनवण्याच्या साच्याला तेल लावा आणि मोदक तयार करा.
९. अशाप्रकारे तुमचे कॉफी-अक्रोड मोदक तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व ही रेसिपी @astyhealthyyummy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. वाजात गाजात विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला अखेर निरोप देण्याची वेळ आली आहे. अवघ्या दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन (Anant Chaturdashi 2024) १७ सप्टेंबरला होईल.अनंत चर्तुदशीला गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सर्वात चांगला मुहूर्त हा दुपारी ३ वाजून २० मिनिटांपासून ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल. विसर्जन करण्यापूर्वी पूजेची वेळ सकाळी ६ ते ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे.