Anda Bhaji Recipe : अंडी आपल्यापैकी सर्वांनाच आवडते. अनेक जण सकाळी नाश्ता असो की दोन्ही वेळीचे जेवण आवडीने अंडी खातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हौशीने अंडी खातात. खरं तर अंडी आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यात असलेले पोषक घटक आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. काही लोक उकळून अंडी खातात तर काही लोक अंड्यापासून बनवता येणारे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात.
तुम्ही सुद्धा आजवर अंडा भाजी, अंडाकरी, अंडाभूर्जी, ऑम्लेट असे विविध पदार्थ खाल्ले असतील पण तुम्ही कधी अंडा भजी खाल्ली आहे का? तुम्हाला वाटेल अंड्याची भजी कशी बनवतात? पण हे खरंय. ही खूप हटके रेसिपी आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे. यालाच आपण अंडा भजी म्हणतो. अंडा भजी ही हटके रेसिपी फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता. ही भजी कशी बनवायची, चला तर जाणून घेऊ या.
साहित्य
- उकळलेली अंडी
- बेसन
- तांदळाची पीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- कढीपत्ता
- आलं लसणाची पेस्ट
- लाल तिखट
- मीठ
- हळद
- जिरेपूड
- काळेमिरी पावडर
हेही वाचा : Gul Poli : पालकांनो, हिवाळ्यात आवर्जून मुलांसाठी बनवा गुळ पोळी; बनवायला अगदी सोपी, जाणून घ्या रेसिपी
कृती
- सुरुवातीला उकळलेल्या अंड्याचे वरील कवच काढून घ्या.
- अंड्याला सुरीने दोन उभ्या भागामध्ये कापून घ्या. एका अंड्याचे दोन उभे भाग करा.
- एका भांड्यामध्ये बेसन घाला आणि त्यात तांदळाचे पीठ घाला
- त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट टाका.
- त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, जिरेपूड आणि काळे मिरी पावडर घाला.
- चवीनुसार मीठ घाला.
- हे मिश्रण पाण्याने भिजवून घ्या. मिश्रण जाडही नको आणि जास्त पातळही नको.
- या मिश्रणात थोडे तेल घाला.
- कापलेल्या अंड्यावर थोडे मीठ आणि काळे मिरी किंवा चाट मसाला टाका
- एका कढईत तेल गरम करा
- त्यानंतर कापलेले अंडी मिश्रणात भिजवून गरम तेलात सोडा.
- कमी आचेवर ही भजी तळून घ्या.
- अंडा भजीला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्या
- तुमची अंडाभजी तयार होईल.
- हिरव्या मिरचीच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही या अंडाभजीचा आस्वाद घेऊ शकता.