तुम्ही अंड खाता का? तुम्हाला अंड खायला आवडत असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक हटके रेसिपी आहे. आतापर्यंत तुम्ही अंड्याचे ऑम्लेट, अंड्याची भुर्जी, अंडा मसाला, अंडा करी किंवा अंडा बिर्याणी असे पदार्थ खाल्ले असतील. तुम्ही म्हणाल, अंड्यापासून आता यापेक्षा वेगळं काय बनवणार? तर अशी एक रेसिपी आहे जी कदाचित तुम्ही कधी ट्राय केली नसावी ती म्हणजे अंडा घोटाळा. नावाप्रमाणेच यामध्ये अंडा घोटाळाची रेसिपी देखील थोडी हटके आहे. आतापर्यंत तुम्ही कच्च अंड फोडून त्याची ऑम्लेट किंवा भुर्जी खाल्ली असेल किंवा अंड उकडून त्याची करी, मसाला किंवा बिर्याणी खाल्ली असेल. पण अंडा घोटाळा तयार करताना अंड उकडून त्याचे तुकडे करून किंवा किसून वापरले जाते. तुम्हाला ऐकायला हे सर्व विचित्र वाटत असेल पण चवीला ही रेसिपी अप्रतिम आहे. तुम्ही एकदा अंडा घोटळा खाऊन तर पाहा तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
अंडी घोटाळा साहित्य
२ चमचे तेल
2 चमचे बटर
१ कांदा (चिरलेला)
हिरवा लसूण कप (चिरलेला)
ताजी कोथिंबीर थोडी मूठभर
१ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
१ चिमूट हळद पावडर
१/२ टीस्पून धने पावडर
१/२ टीस्पून जिरे पावडर
१ चिमूटभर गरम मसाला
१ टीस्पून लाल तिखट
चवीनुसार काळी मिरी पावडर
४ उकडलेले अंडी
चवीनुसार मीठ
हेही वाचा- झटपट बनवा स्वादिष्ट पालक भात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल ही हटके रेसिपी
अंडी घोटाळा कृती
अंड्याचा घोटला बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवा, त्यात तेल आणि बटर घाला, कांदा, हिरवा लसूण, ताजी धणे आणि हिरवी मिरची पेस्ट घाला, कांदा शिजेपर्यंत 2-3 मिनिटे शिजवा. कांदे शिजले की गॅस मंद करून त्यात सर्व मसाले टाकून परतून घ्या. त्यात थोडं गरम पाणी घालून एक मिनिट मंद आचेवर शिजवा. आता मॅशरच्या मदतीने मसाले चांगले मॅश करा आणि उकडलेले अंड त्यात किसून किंवा काप करून घ्या. पुढे चवीनुसार मीठ टाका, चांगले परतून घ्या आणि मंद आचेवर शिजत असताना गरम पाणी घालून शिजवा. त्यात कच्च अंड फोडून तुम्ही परतून घेऊ शकता किंवा वेगळा हाफ फ्राय करून त्यावर ठेवू शकता.
हेही वाचा – चटपटीत मसाला कॉर्न चाट, फक्त ५ मिनिटांत होईल तयार! लिहून घ्या सर्वांच्या आवडत्या पदार्थाची रेसिपी
एक छोटा कढई ठेवा आणि त्यात थोडे तेल गरम करा, तेल चांगले तापले की, 1 अंडे थेट पॅनमध्ये फोडा आणि मीठ घाला, लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि धणे घाला, अंडी जास्त शिजवू नका, अंड्यातील पिवळ बलक द्रव स्वरुपात असावे. हाफ फ्राय तयार झाल्यावर घोटाळ्यामध्ये घाला, चांगले परतून घ्या. अंडा घोटाळा तयार आहे.