Anda Masala Pav Recipe : सोशल मीडियावर अनेक रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपी खूप हटके असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला पण घरी पुन्हा तोच पदार्थ तयार करण्याची इच्छा होते. सध्या हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात अंडी खाण्याची खूप इ्च्छा होते. अंडी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशी आहे. अंड्याचे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे निरोगी आहारात सुद्धा अंड्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
तुम्ही अंड्यापासून अनेक पदार्थ तयार करू शकता. तुम्ही कधी अंडा मसाला पाव खाल्ला आहे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंडा मसाला पाव कसा तयार करतात? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. (Anda Masala Pav Recipe do you ever eat egg masala pav dish video goes viral)

या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

  • अंडी
  • हळद
  • मीठ
  • तिखट
  • जिरे
  • बारीक चिरलेली मिरची
  • कांदा
  • टोमॅटो
  • गरम मसाला
  • धना पावडर
  • जिरा पावडर
  • गरम पाणी
  • बारीक चिकलेली कोथिंबीर

हेही वाचा : Amla Candy: मार्केटमध्ये मिळणारी आंबट, गोड ‘आवळा कँडी’ आता घरच्या घरी बनवा; रेसिपी आणि फायदे जाणून घ्या

Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
How long to boil eggs
कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
healthy besan toast recipe
Healthy Besan Toast: लहान मुलांना हेल्दी नाश्ता द्यायचाय? मग लगेच बनवा ही ‘बेसन टोस्ट’ रेसिपी
The reason Behind Flying Kites on Makar Sankranti
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? काय आहे कारण, जाणून घ्या
crispy twister recipe
Crispy Twister Recipe: कुरकुरीत आणि चवदार खायचंय? मग बटाट्याची ‘ही’ रेसिपी ट्राय कराच

कृती

  • सुरुवातीला अंडी गरम पाण्यात थोडे मीठ टाकून उकळून घ्यावी.
  • त्यानंतर अंडी सोलून घ्यावी आणि अंड्याचे उभे दोन काप करावे.
  • त्यानंतर काप केलेली अंडी तेलातून मध्यम आचेवर तळून घ्यावीत. त्यावर हळद लाल तिखट घालावे. आणि ही मध्यम फ्राय केलेली अंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यावी.
  • त्यानंतर कढईत तेल घ्यावे.
  • तेल गरम झाले की त्यात जिरे, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा चिरून घ्यावा.
  • त्यानंतर त्यात थोडी आलं लसणाची पेस्ट टाकावी. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकावा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना, जिरा पावडर, मीठ टाकावे. आणि त्यानंतर थोडे गरम पाणी करावे आणि मसाले चांगले एकत्रित करावे.
  • मिश्रण चांगले शिजू द्यावे.
  • त्यानंतर त्यात तळलेली अंडीचे काप टाकावे. हे अंडी या मिश्रणामध्ये एकजीव करावे आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
  • अंडा मसाला तयार होईल.
  • तुम्ही हा अंडा मसाला पावबरोबर खाऊ शकता.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

swast_ani_mast_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नाश्त्यासाठी बनवा झणझणीत अंडा मसाला”

हेही वाचा : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा सचिनसोबत बेडरुममध्ये धमाकेदार डान्स; VIDEO तुफान व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान रेसिपी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर”

Story img Loader