स्वयंपाकाच्या जगात त्याच्या अष्टपैलू गुणधर्मासाठी ओळखली जाणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे अंडे ! अंड्याची करी, मसाला, ऑम्लेट, अंडा घोटाळा आणि बरेच पदार्थ तयार केले जातात. या विविध रेसिपी तुम्ही चाखल्या असाव्यात पण आज आम्ही तुम्हाला थोडी वेगळी रेसिपी सांगणार आहोत जी कदाचित तुम्हाला माहित नसेल. अंडा तवा मसाला ही रेसिपी तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा नक्की खाऊन पाहा. या रेसिपीची चव अत्यंत स्वादिष्ट आहे पण ही रेसिपी तयार करणे देखील सोपे आहे. फार कमी वेळात ही रेसिपी तयार केली जाऊन शकते. चला तर मग जाणून घेऊ या सोपी रेसिपी
तवा अंडी मसाला रेसिपी
साहित्य
३ उकडलेले अंडी
१ चिरलेला कांदा
२चिरलेला टोमॅटो
१ टीस्पून लाल मिरची पावडर
१ टीस्पून मिरपूड
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मोहरी
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
हेही वाचा – घरीच तयार करा हेल्दी आणि टेस्टी मशरूम लॉलिपॉप्स! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी
हेही वाचा – गोड खायला आवडतं का? मग मिश्र धान्यांची खीर खाऊन पाहा अन् हेल्दी राहा! रेसिपी आहे अगदी सोपी
रेसिपी
१. प्रथम तीन उकडलेले अंडी घ्या आणि त्यांचे अर्धे काप करा.
२.गरम तव्यावर तेल टाकून काप त्यात ठेवा. आणि तिखट मीठ टाकून परतून घ्या.
३. नंतर कढईत थोडे तेल घालून मोहरी आणि चिरलेला कांदा घाला. मऊ होईपर्यंत शिजवा.
४.आता हिरव्या मिरच्यांसोबत टोमॅटो आणि मसाला घाला.
५.आता उकडलेले अंडे घालून सर्व चांगले मिसळा. कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.