-शुभा प्रभू साटम

साहित्य :

इडली पीठ, किसलेले चीझ, ड्राय हब्र्ज, रेड चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझनिंग, शेजवान सॉल, उकडलेले आणि चेचलेले मका दाणे, चिली सॉस, पेरी पेरी मसाला, बारीक चिरलेला पालक, लोणी.

कृती :

इडलीच्या पिठात सर्व मसाले, चीझ, मक्याचे दाणे, पालक, सॉस एकत्र करावे. आता त्याचे नेहमीप्रमाणे आप्पे काढावेत. भाजण्यासाठी लोणी वापरावे. वेळ हाताशी असेल तर नुसत्या पिठाचे अर्धे आप्पे भाजून घ्यावेत. त्यात बाकीच्या मिश्रणाचे सारण करून भरावे आणि वरून पीठ घालून परत आप्पे भाजावेत. असे भरलेले आप्पेही होतात.

Story img Loader