शेफ नीलेश लिमये
साहित्य
* २ हिरवी सफरचंद, २ चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे चक्का, १ मोठा चमचा मध किंवा काकवी, १०-१२ पालकाची कोवळी पाने, १ चमचा भाजलेली खसखस, अक्रोड/स्ट्रॉबेरी/चेरीज आवडत असतील तर.
कृती :
सफरचंद थोडय़ाशा गरम पाण्यात बुडवून स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे छान काप करा. त्यावर लिंबाचा रस ओतून फ्रीजमध्ये १०-१५ मिनिटे ठेवा. पालकाची कोवळी पाने धुऊन घ्या. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन, पुसून त्याच्या फोडी करा. आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये चक्का आणि मध किंवा काकवी एकत्र करून घ्या.
ज्या बाऊलमध्ये सॅलड देणार आहात, त्यात सफरचंदाच्या फोडी, पालकाची पानं, स्ट्रॉबेरी, अक्रोड एकत्र करा. यावर दह्य़ाचं ड्रेसिंग घाला. वरून भाजलेली खसखस पेरा आणि हे आगळंवेगळं सॅलड खायला तयार आहे.