आज भाऊबीज सर्वत्र साजरी केली जात आहे. भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीतील अतूट नात्याला अजून सुरक्षित करणारा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी, त्याच्या उज्जवल भविष्यासाठी पूजा करते. या दिवशी भाऊ बहीण दोन्ही एकमेकांना भेटवस्तू देतात, गोड भरवतात. चला तर यंदाच्या भाऊबीजेला भावाचे तोंड गोड करण्यासाठी बनवा ऍपल खीर या रेसिपीनं तुमची भाऊबीज होईल एकदम खास. चला तर पाहुयात रेसिपी..
ऍपल खीर साहित्य
- ३-४ टेबलस्पून किसलेले सफरचंद
- १ कप आटवलेले दूध
- २ टीस्पून साखर
- ३-४ काजू
- २ बदाम
- २ पिस्ते
- १/४ टीस्पून वेलची पूड
- १ टीस्पून तूप
ऍपल खीर कृती
स्टेप १
टेबलस्पून किसलेले सफरचंद, १ कप आटवलेले दूध, २ टीस्पून साखर, ३-४ काजू, २ बदाम, २ पिस्ते, १/४ टीस्पून वेलची पूड, १ टीस्पून तूप हे सर्व साहित्य घ्या
स्टेप २
गॅसवर तवा मध्यम आचेवर ठेवा. त्यात तूप घाला. त्यात किसलेले सफरचंद घाला. ते सतत मिक्स करत रहा. ५ ते १० मिनिटे शिजू द्या. या दरम्यान गॅस मंद आचेवर असावा. सफरचंद शिजल्यानंतर गॅस बंद करा. थंड होऊ द्या.
स्टेप ३
आता एका खोल तळाच्या पॅनमध्ये दूध घाला. एक उकळी येऊ द्या. उकळल्यानंतर गॅस हळूहळू कमी करा. ५ ते १० मिनिटे घट्ट होऊ द्या. ते सतत चालू ठेवा. पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या.
स्टेप ४
ड्राय फ्रूटचे स्लाइस करून ते पुन्हा सफरचंदासोबत परतून घेतले. आता आटवलेले दूध, वेलची पूड त्यात घालून छान उकळून घेतले.
हेही वाचा >> भाऊबीजेला भावाचे तोंड गोड करण्यासाठी बनवा ‘केशरी भात’; लगेच नोट करा सोपी रेसिपी
स्टेप ५
फ्रीजमध्ये ठेवा. थंड होऊ द्या. यानंतर त्यात तळलेले सफरचंद घाला. ते चांगले मिसळा. आता तुम्ही ही खीर सर्व्ह करू शकता. तुम्ही सजवण्यासाठी सफरचंदाचे तुकडे देखील वापरू शकता.