Apple Rabdi In Marathi : आपल्यातील अनेकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर गोड काहीतरी खाण्याची इच्छा होते. मग आपण फ्रिजमध्ये काही गोड खायला आहे का हे शोधण्यास सुरुवात करतो. तर तुम्हालाही असं गोड खाण्याची इच्छा होत असेल आणि घरात काही सफरचंद असतील, तर तुम्ही एक गोड पदार्थ बनवू शकता. तर आज तुम्ही सफरचंदाची रबडी बनवून पाहा. सफरचंद, केळी ही फळंही भरपूर खाल्ली जातात, त्यामुळे या फळांचा तुमच्या रबडीमध्ये समावेश करा आणि स्वादिष्ट प्रसादाच्या पाककृती बनवा… तर सफरचंदाची रबडी (Apple Rabdi) कशी बनवायची चला पाहू…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

१. ५ किंवा ६ सफरचंद

२. छोटं पॅकेट मिल्क पावडर

३. दोन चमचा तूप

४. पाव लिटर दूध

हेही वाचा…Diwali Special Chakli Recipe : नेहमीच्या चकलीला द्या थोडा ट्विस्ट, यंदा दिवाळीत बनवा पोह्यांची कुरकुरीत चकली; वाचा साहित्य, कृती

कृती :

१. सफरचंद स्वछ धुवून पुसून घ्या.

२. त्यानंतर सफरचंदाचे तुकडे करा आणि किसणीवर किसून घ्या.

३. कढईत दोन चमचे तूप घाला.

४. त्यात किसलेलं सफरचंद घाला आणि परतवून घ्या.

५. मिश्रण तोपर्यंत हलवत रहा, जोपर्यंत ते मऊ होत नाही किंवा त्याला तूप सुटत नाही.

६. त्यात पाव लिटर गरम दूध टाका.

७. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.

८. त्यानंतर त्यात मिल्क पावडर टाका.

९. पाच ते दहा मिनिटे परतवून घ्या.

११. रबडी तयार झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा.

१०. अशाप्रकारे तुमची सफरचंदाची रबडी (Apple Rabdi) तयार.

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे :

सफरचंदात फायबर असते, जे पचनास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते, त्याचप्रमाणे दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर ठरते.
सफरचंदातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. या फ्लॅट कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. तर एवढे आरोग्यदायी फायदे असणारा सफरचंदाची रबडी (Apple Rabdi) तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि दुपारी किंवा रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही हमखास खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple rabdi how to make healthy home made sweet dish not down ingredients for this recipe in marathi asp