Apple Sheera Recipe : अनेकदा गोड काहीतरी खायची इच्छा होते अशावेळी आपण झटपट तयार होणारा साजूक तुपातला शिरा करतो पण तुम्ही नेहमी नेहमी रव्याचा शिरा खाऊन कंटाळला आहात का? जर हो तर, आज आम्ही एक भन्नाट व हटके शिराची रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी सफरचंदाचा शिरा खाल्ला आहे का? हो, सफरचंदाचा शिरा. अतिशय झटपट तयार होणारा व खायला टेस्टी वाटणारा सफरचंदाचा शिरा हा एक उत्तम पर्याय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा शिरा कसा नेमका कसा बनवायचा? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सफरचंदाचा शिरा कसा बनवायचा, याविषयी सांगितले आहे. (Apple Sheera Recipe : how to make Apple Sheera watch video to know easy recipe)

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

साहित्य

  • सफरचंद
  • तुप
  • साखर
  • मीठ
  • रवा
  • चारोळी
  • दूध
  • वेलची पूड
  • सुकामेवा

हेही वाचा : वांग्याची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग झटपट करा ‘भरलेल्या वांग्याचे रोल्स’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

कृती

  • सफरचंद स्वच्छ धुवून घ्या
  • सफरचंदाचे बारीक तुकडे करा.
  • गॅसवर कढई ठेवा आणि कढईत साखर टाका
  • त्यात पाणी घाला आणि किंचित मीठ घाला.
  • मिश्रण उकळायला लागले की त्यात सफरचंदाचे तुकडे घाला.
  • त्यानंतर सफरचंदाचे तुकडे दोन मिनिटे शिजवून घ्या.
  • सफरचंदाचे सिरप तयार होईल
  • त्यानंतर दुसऱ्या एका कढईत साजूक तुप गरम करा.
  • त्यात बारीक रवा परतून घ्या
  • रवा परतल्यानंतर त्यात चारोळी घाला.
  • त्यानंतर त्यात उकळते दूध घाला.
  • त्यानंतर तयार केलेले सफरचंदाचे सिरप त्यात टाका.
  • त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.
  • त्यानंतर शेवटी त्यात वेलची पूड, आवडीप्रमाणे सुकामेवा व साजूक तुप घाला.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Raw Banana Recipe : कच्ची केळीपासून बनवलेला हा पदार्थ कधी खाल्ला आहे का? मग रेसिपी लगेच लिहून घ्या

marathikitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सफरचंदाचा शिरा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर” तर एका युजरने लिहिलेय, “मी पण एकदा बनवून बघणार.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज काहीतरी नवीन शिकायला मिळाले.”

काही दिवसांपूर्वी असाच एक हटके रेसिपीचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये मॅगी डोसा कसा बनवायचा? याविषयी सांगितले होते. तुम्ही आजवर मॅगी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली असेल पण मॅगीपासून डोसा कसा बनवायचा, हे अनेकांनी पहिल्यांदाच पाहिले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.