जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो. रोज रोज काय करायचं भाजीला या प्रश्नानं तुम्हीह कंटाळला असाल तर काळजी करु नका. आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत. ढाब्यावर जेवायला सगळ्यांनाच आवडतं आज आम्ही तुम्हाला अशीच ढाला स्टाईल दम अरबी ग्रेवीची रेसिपी दाखवणार आहोत. चला तर मग पाहुयात, चमचमीत रस्सेदार ढाबा स्टाईल दम अरबी ग्रेवी
ढाबा स्टाईल दम अरबी ग्रेवी भाजी साहित्य
- ५०० ग्राम अरबी
- २ कांदे
- २ टोमॅटो
- १/२ टेबलस्पून आले मिरची लसूण पेस्ट
- १/२ टेबलस्पून लाल मिरची पावडर
- १/२ टेबल स्पून गरम मसाला
- १ टीस्पून हळदी पावडर
- १/२ टेबलस्पून धना पावडर
- १ १/२ टेबलस्पून तेल
- १ टीस्पून मोहरी जीरे
- १/३ कप दही
- १ टीस्पून ओवा
- १ टीस्पून धना जीरा बडीशेप पावडर
- चवीनुसार मीठ
- कोथंबीर
ढाबा स्टाईल दम अरबी ग्रेवी भाजी कृती
स्टेप १
सर्वात आधी अरबी स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ नंतर कुकर मध्ये बॉईल करून घेऊ
स्टेप २
बॉईल केल्यानंतर अरबीची साल काढून गोल गोल कट करून घेऊ टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊ कांद्याची ग्रेव्ही करून घेऊ अद्रक मिरची लसूण पेस्ट तयार करून घेऊ.
स्टेप ३
अरबीचे गोल केलेल्या तुकड्यां वर थोडे हळद, मिरची पावडर, धना पावडर, मीठ टाकून घेऊ.
स्टेप ४
आता फोडणीची तयारी करून घेऊ, दही घोटून तयार करून घेऊ.
स्टेप ५
आता कढईत तेल तापवून मोहरी जीरे टाकल्यानंतर कांदे आले मिरची लसूण पेस्ट परतून घेऊ. दिल्याप्रमाणे मसाले मीठ टाकून परतून घेऊन त्यात टोमॅटो प्युरी टाकून परतून घेऊ.
स्टेप ६
दिल्याप्रमाणे मसाले, मीठ टाकून परतून घेऊन त्यात टोमॅटो प्युरी टाकून परतून घेऊ.
स्टेप ७
टोमॅटो परतून झाल्यावर घोटलेले दही टाकून घेऊ.गरजेनुसार पाणी टाकून घेऊ, ग्रेव्ही उकळल्यानंतर अरबीचे पिसेस टाकून देऊ.
हेही वाचा >> अस्सल गोवन चवीची मसालेदार ‘फणसाच्या भाजीची’ सोपी रेसिपी; लगेच नोट करा
स्टेप 8
ग्रेव्हीमध्ये अरबी छान शिजवून घेऊ नंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करून देऊ
स्टेप 9
तयार ढाबा स्टाईल अरबी ग्रेव्ही मसाला