Mixed Vegetable Paratha: मुलं अनेकदा भाज्या खायला कंटाळा करतात अशावेळी भाज्या मिक्स करुन विविध पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मिक्स व्हेजिटेबल पराठ्याची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. नाश्त्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे, शिवाय हा पराठा पौष्टिक असून मुलं आवडीने खातील. चला तर मग जाणून घेऊया मिक्स व्हेजिटेबल पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…
मिक्स व्हेजिटेबल बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. ५-६ कप गव्हाचे पीठ
२. १०० ग्रॅम उकडलेले मटार
३. १ कप उकडलेले बटाटे
४. १ कप बारीक चिरलेला कोबी
५. १ कप किसलेले फ्लॉवर
६. १ कप किसलेले गाजर
७. १ कांदा बारीक चिरलेला
८. १ चमचा हिरवी मिरची चिरलेली
९. १ चमचा लाल तिखट
१०. १ चमचा जिरे
११. तेल आवश्यकतेनुसार
१२. मीठ चवीनुसार
मिक्स व्हेजिटेबल बनवण्याची कृती:
१. सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मटार, बटाटा, फ्लॉवर, गाजर, कोबी टाकून मध्यम आचेवर शिजवून घ्या.
२. त्यानंतर चाळणीच्या साहाय्याने भाजीचे पाणी वेगळे करा.
३. आता एका परातीत गव्हाचे पीठ घ्या आणि या पीठात उकडलेल्या सर्व भाज्या स्मॅश करून घ्या.
४. आता या मिश्रणात कांदा, मिरची लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा आणि थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.
५. मळलेल्या पीठाचे पराठे बनवून घ्या.
६. आता गॅसवर तवा मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि तवा गरम झाल्यावर त्यात थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा.
हेही वाचा: मुलांसाठी घरच्या घरी अवघ्या १५ मिनिटांत बनवा टेस्टी पनीर फ्रँकी; नोट करा साहित्य आणि कृती
७. तव्यावर पराठा टाकून दोन्ही भाजून तेल लावून खरपूस भाजून घ्या.
८. तयार गरमागरम पराठा दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.