स्वयंपाक करणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. घरातल्याच्या आवडी-निवडी आणि आरोग्यासाठी काय चांगले काय नाही याचा विचार करून जेवण बनवावे लागते. रोज भाजी काय करावी असा प्रश्न अनेक गृहिनींना पडतो. तुम्हालाही रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट तयार होणारी ही टोमॅटो पुलाव रेसिपी नक्की ट्राय करा.

टोमॅटो पुलाव रेसिपी

टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य

tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Diwali special karle kanda chivda recipe in marathi chivda recipe in marathi snaks recipe in marathi
यंदा दिवाळीला करा स्पेशल कारले कांदा कुरकुरे चिवडा; कुरकुरीत, खमंग चिवडा करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी
tomato ketchup adulteration
टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bhakri chaat recipe Video
आंबट-गोड चटपटीत चाट खायला आवडतं? एकदा भाकरी चाट खाऊन तर पाहा
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
How To Make Coconut Jaggery Barfi
Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल
Find out if you should switch to cauli rice like Kartik Aaryan did while shooting for Chandu Champion
चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
  • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
  • १” आलं
  • १ मोठा चमचा तेल
  • १५~२० काजू
  • १ चमचा जिरं
  • १” दालचिनीचा तुकडा
  • ३ हिरवी वेलची
  • १ चक्रीफूल
  • ५ लवंगा
  • ४~५ काळी मिरी
  • कढीपत्ता
  • २ तमालपत्र
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा धनेपूड
  • १/४ चमचा हळद
  • १ चमचा गरम मसाला
  • २ चमचे लाल तिखट
  • १ चमचा गूळ पावडर (ऐच्छिक)
  • १ कप अख्खा बासमती तांदूळ
  • १ १/४ कप पाणी
  • चवीनुसार मीठ
    बुंदी रायता
  • १/४ कप बुंदी
  • पाणी
  • १/२ कप दही
  • पाणी
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/४ चमचा जिरेपूड
  • १/४ चमचा काळं मीठ
  • थोडी पुदिन्याची पाने (ऐच्छिक)

टोमॅटोचा पुलाव बनवण्याची कृती

  • प्रथम तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घ्या. एक चमचा आले टाका आणि त्याची पेस्ट करून घ्या. टोमॅटो चिरले तरी चालेल.
  • आता एक पॅन गरम करून त्यात काजू टाकून चांगले भाजून बाजूला काढा.
  • आता त्यात तेल टाका आणि त्यात जिरे घाला. त्यात कडीपत्ता टाका आणि त्यानंतर लगेच दालचिनी, लवंग, काळी मिरी, तमालपत्र हा खडा मसाला घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.
  • कांदा छान परतला की त्यात टोमॅटो प्युरी घाला. तेल सुटेपर्यंत परतून ध्या
  • आता यात मसाले टाका. त्यात धनेपूड, हळद, गरम मसाला, ब्यॅडगी मिरची लाल तिखट टाकून चांगले परतून घ्या.
  • इवे असेल तर टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात चमचाभर गूळ किंवा साखर घाला.
  • आता एक बासमती तांदूळ स्वच्छ धूवून घ्या. आधी तो पाण्यात अर्धा तास भिजवा. हा भिजवलेला तांदूळ पॅनमध्ये टाका. त्यात एक कप पाणी टाका. चवीनुसार मीठ आणि साजूक तूप टाका. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि झाकण ठेवून भाज शिजू द्या.
  • चांगली वाफ आल्यानंतर भात तयार होईल आणि चमच्याने एकदा मिक्स करून घ्या. आता गरमा गरम टोमॅटो पुलाव खाऊ शकता.

हे रेसिपी मधुराज रेसिपी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.