स्वयंपाक करणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. घरातल्याच्या आवडी-निवडी आणि आरोग्यासाठी काय चांगले काय नाही याचा विचार करून जेवण बनवावे लागते. रोज भाजी काय करावी असा प्रश्न अनेक गृहिनींना पडतो. तुम्हालाही रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट तयार होणारी ही टोमॅटो पुलाव रेसिपी नक्की ट्राय करा.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
टोमॅटो पुलाव रेसिपी
टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
- १” आलं
- १ मोठा चमचा तेल
- १५~२० काजू
- १ चमचा जिरं
- १” दालचिनीचा तुकडा
- ३ हिरवी वेलची
- १ चक्रीफूल
- ५ लवंगा
- ४~५ काळी मिरी
- कढीपत्ता
- २ तमालपत्र
- १ बारीक चिरलेला कांदा
- २ हिरव्या मिरच्या
- १ चमचा धनेपूड
- १/४ चमचा हळद
- १ चमचा गरम मसाला
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा गूळ पावडर (ऐच्छिक)
- १ कप अख्खा बासमती तांदूळ
- १ १/४ कप पाणी
- चवीनुसार मीठ
बुंदी रायता - १/४ कप बुंदी
- पाणी
- १/२ कप दही
- पाणी
- १/२ चमचा लाल तिखट
- १/४ चमचा जिरेपूड
- १/४ चमचा काळं मीठ
- थोडी पुदिन्याची पाने (ऐच्छिक)
टोमॅटोचा पुलाव बनवण्याची कृती
- प्रथम तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घ्या. एक चमचा आले टाका आणि त्याची पेस्ट करून घ्या. टोमॅटो चिरले तरी चालेल.
- आता एक पॅन गरम करून त्यात काजू टाकून चांगले भाजून बाजूला काढा.
- आता त्यात तेल टाका आणि त्यात जिरे घाला. त्यात कडीपत्ता टाका आणि त्यानंतर लगेच दालचिनी, लवंग, काळी मिरी, तमालपत्र हा खडा मसाला घाला. आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.
- कांदा छान परतला की त्यात टोमॅटो प्युरी घाला. तेल सुटेपर्यंत परतून ध्या
- आता यात मसाले टाका. त्यात धनेपूड, हळद, गरम मसाला, ब्यॅडगी मिरची लाल तिखट टाकून चांगले परतून घ्या.
- इवे असेल तर टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात चमचाभर गूळ किंवा साखर घाला.
- आता एक बासमती तांदूळ स्वच्छ धूवून घ्या. आधी तो पाण्यात अर्धा तास भिजवा. हा भिजवलेला तांदूळ पॅनमध्ये टाका. त्यात एक कप पाणी टाका. चवीनुसार मीठ आणि साजूक तूप टाका. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि झाकण ठेवून भाज शिजू द्या.
- चांगली वाफ आल्यानंतर भात तयार होईल आणि चमच्याने एकदा मिक्स करून घ्या. आता गरमा गरम टोमॅटो पुलाव खाऊ शकता.
हे रेसिपी मधुराज रेसिपी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.
First published on: 03-11-2024 at 13:36 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you bored of eating roti and sabji every day then make tasty tomato pulao instantly