नाश्ता हा दिवसभरातील महत्त्वाचा आहार असतो. ऑफिस, शाळा आणि कालेजच्या गडबडीत झटपट तयार करता येईल असा पर्याय आपण शोधत असतो. त्यात नाश्त्यासाठी रोज पोहे, उपीट खाऊन कंटाळा येतो? पण वेगळे काय करावे हे देखील सुचत नाही. काळजी करू नका आमच्याकडे तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला चविष्ट आणि पोटभर नाश्त्यासाठी एक सोपा पदार्थ आम्ही सुचवाणार आहोत. लहानांपासून मोठ्या सर्वांचा आवडले असा हा पदार्थ बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ असतो. याला रव्याचे अप्पे म्हणू शकता. झटपट तयार होणारे रव्याचे अप्पे कसे तयार करावे ते जाणून घ्या.

कुरकुरीत रव्याचे अप्पे!

साहित्य
२५० ग्रॅम किंवा एक मोठा कप रवा
पाव कप तांदळाचे पीठ किंवा गहू/ ज्वारी पीठ
२५० ग्रॅम दही
अर्धा चमचा जिरे
२-३ चिरलेल्या मिरच्या
७-८ चिरलेल्या कडीपत्त्याची पाने
अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी,
एक बारीक चिरलेला कांदा
एक बारीक चिरलेला टोमॅटो
थोडीशी चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
आल लसून पेस्ट- हवे असल्यास
एक ते दीड कप पाणी

हेही वाचा – तुम्ही कधी वांग्याचे थालपीठ खाल्ले आहे का? नसेल तर खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी

कृती
सर्वप्रथम एका भांड्यात २५० ग्रॅम किंवा एक मोठा कप रवा घ्या. त्यात पाव कप तांदळाचे पीठ किंवा गहू/ ज्वारी पीठ, २५० ग्रॅम दही, अर्धा चमचा जिरे, २-३ चिरलेल्या मिरच्या, ७-८ चिरलेल्या कडीपत्त्याची पाने, अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाका. सर्व पदार्थ एकत्र करून घ्या त्यात हवे असेल अर्धा चमचा आल लसून पेस्ट घालू शकता. या मिश्रणात एक ते दीड कप गरजेनुसार पाणी घाला आणि १० मिनिटे पीठ भिजत ठेवा.

हेही वाचा – आजीबाईंनी तव्यात रगडल्या मिरच्या अन् बनवला झणझणीत ठेचा! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच!

तुम्ही अप्पे पात्रामध्ये या पीठापासून छोटे छोटे अप्पे तयार करू शकता. अप्पे नसतील तर एका छोट्या पॅनमध्ये तुम्ही अप्पे तयार करू शकता.

अप्पे पात्र किंवा पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात थोडे तेल टाकून तयार पीठ टाका. ५ मिनिटे झाकण ठेवून एका बाजून चांगले भाजून घ्या. नंतर अप्पे पलटून दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजून घ्या.

गरमा गरम कुरकरीत अप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी किंवा सॉस खाऊ शकता.

हेही वाचा – पाण्याशिवाय अंडी कशी उकडवावी? गावाकडे वापरली जाणारी हटके पद्धत एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

ही रेसिपी Cooking ticket marathi नावाच्या युट्यूब चॅनेलवर दिली आहे.