साहित्य – १ चमचा लोणी, १ चमचा ऑलिव्ह तेल, १ लहान कांदा, १ सेलरीची कांडी, २ लसूण पाकळ्या, ५ कप किसलेले गाजर, ४ कप चिकन रस्सा, अर्धा चमचा मीठ, मिरपूड.

कृती

  • आधी कांदा बारीक चिरून घ्या. लसूण ठेचून घ्या. सेलरीच्या काडय़ाचे तुकडे करून घ्या. लोणी आणि तेल एका भांडय़ात घाला. ते गॅसवर ठेवून त्यात कांदा, लसूण व सेलरीची काडी घालून ५ मिनिटे शिजवून घ्या. आता यात गाजर घाला. ढवळल्यानंतर पाणी आणि चिकनचा रस्सा घालून गरम करा. मंद आचेवर २० मिनिटे शिजवा. भांडे आचेवरून उतरवून ठेवा. गार झाल्यावर ब्लेंडरमधून बारीक करून घ्या. मिरपूड, मीठ घालून ढवळा. गरम करून प्या.

Story img Loader