शेफ नीलेश लिमये

साहित्य

२ शहाळी, अर्धी वाटी स्वीट कॉर्न, अर्धी वाटी डाळिंब्याचे दाणे, ५-६ बेसीलची पानं ड्रेसिंगसाठी

२ मोठे चमचे मध, २ चमचे लिंबाचा रस, चवीपुरते काळे मीठ

कृती :

  • शहाळ्यातली मलई काढून घ्या. मलई अगदी पातळ नको आणि अगदी जाडही नको. अशी हवी की जिचे छान कापही करता येतील आणि खाताना दाताखालीही येणार नाही. तर स्वीट कॉर्नचे दाणे ब्लांच करून घ्या. डाळिंबाचे दाणे, स्वीट कॉर्नचे दाणे आणि मलई एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्या. हे मिश्रण गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता ड्रेसिंगसाठीचे मध, लिंबू रस आणि काळे मीठ एकत्र करून घ्या.

खायला देताना बाऊलमधील मिश्रणावर हे ड्रेसिंग घाला आणि बेसिलच्या पानांची सजावट करा. हे वेगळं सॅलड तुम्हाला नक्की आवडेल.

nilesh@chefneel.com