अद्वय सरदेसाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

*  मटार ३ कप भरून

*  १ लहान कांदा

* दीड कप दूध

* १चमचा लोणी

* चवीसाठी मीठ

* मिरपूड

कृती

कांदा बारीक चिरून घ्या. एका भांडय़ात लोणी घालून तो परतून घ्या. आता यात मटार घालून २-३ मिनिटांसाठी परतून घ्या. त्यात दूध घालून ढवळा. आता पुन्हा त्याला उकळी काढा आणि प्रेशर कुकरमध्ये घालून ५ मिनिटे शिजवा. गार झाल्यावर ते ब्लेंडरमधून फिरवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या. गॅसवर गरम करा आणि मीठ, मिरपूड पेरून पेश करा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about green peas soup recipe