ज्योती चौधरी-मलिक
साहित्य
आणखी वाचा
१ कप कणीक, दूध अर्धा कप, सुंठ आणि वेलची पूड, गूळ, तूप
कृती
एका भांडय़ात कणीक, किसून घेतलेला गूळ, सुंठ आणि वेलची पूड आणि दूध यांचे मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळावे. कणकेच्या आणि गुळाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यानंतर नॉनस्टिक तव्यावर तूप घालून हे मिश्रण लहान लहान डोशांसारखे टाकावे. ते खरपूस भाजल्यानंतर गरमागरम मालपुअे तयार.