आज आषाढी एकादशी, सर्व एकादशींमध्ये या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक घरी विठुरायाची पूजा करतात. तसेच या एकादशीला व्रताला विशेष महत्त्व आहे. उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडीची आठवत. मात्र यंदाची आषाढी एकादशी गोड करा. आज उपवासाला स्पेशल उपवासाचे गुलाबजाम करुन बघा. चला तर पाहुयात हे उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपवासाचे गुलाबजाम साहित्य-

  • सव्वाशे ग्रॅम हरियाली मावा (गुलाबजामचा मावा)
  • एक टेबलस्पून अरारूटचे पीठ, एक कप साखर
  • एक कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा (उपवासाला चालत असेल तर)
  • तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतले तरीही चालेल.

उपवासाचे गुलाबजाम कृती-

  • माव्यात अरारूटचे पीठ घालून चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडे दूध घालून मळून घ्या. २०-३० मिनिटं गोळा तसाच ठेवा.
  • नंतर पुन्हा मळून घ्या. छोटे गोळे करून तळून घ्या.
  • साखरेच्या गरम एकतारी पाकात गार गुलाबजाम टाकावेत. सहा ते सात तासांनी खावे.

हेही वाचा – Ashadhi Ekadashi 2023: उपवासाला ट्राय करा वरीच्या तांदळाचा पुलाव; रेसिपी लगेच नोट करा

  • जमल्यास गुलाबजाम करताना त्यात खडीसाखर घाला आणि मग गुलाबजाम गोल वळा.